Money News Man Became Millionaire With Only One Bottle Of Wine Know Actual Price; दारूच्या एका बाटलीची कमाल! क्षणात झाला लखपती, ५० वर्षांपासून तळघरात लपवली अन् आता
कॅलिफोर्निया : दारू किंवा वाईन जितकी जुनी असते तितकी ती मजेदार लागते, ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. जुन्या दारूचा रंग आणि त्याची मादकता खूप खास असते. त्यामुळे मद्यप्रेमी अनेकदा जुन्या दारूची मागणी करताना दिसतात. त्यामुळे त्याची किंमतही जास्त असते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण याच जुन्या दारूमुळे एक व्यक्ती करोडपती बनला आहे. त्याच्याकडे दारूची फक्त १ बॉटल होती. पण लिलावात त्याची एवढी किंमत मिळाली की विचार करून तुम्ही थक्क व्हाल.द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील मार्क पॉलसन नावाच्या व्यक्तीने १९७०च्या दशकातली Domaine de la Romanée-Conti La Tache ची बॉटल विकत घेतली आहे. जी गेली अनेक दशकं एका तळघरात कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये लपवून ठेवली होती. त्यावेळी पॉलसनने ती २५० डॉलर्स म्हणजेच आज २० हजार रुपयांना विकत घेतली आहे. त्यानुसार, त्याची किंमत $१,८८९ इतकी असावी. पण ही दारू जुनी असल्याने लिलावात ती तब्बल १०६,२५० पेक्षा जास्त रुपयांत विकली गेली. म्हणजेच या व्यक्तीला एका दारूच्या बाटलीसाठी ८७ लाख ८३ हजार ८४६ रुपये मिळाले. बॉस हवा तर असा! कर्मचाऱ्यासोबत बायकोलाही देणार पगार, भारतीय तरुणाने वाटले तब्बल ३० कोटी
अपेक्षित किमतीच्या दुप्पट किंमतीला विकली १ दारूची बाटली…
लिलाव गृह बोनहॅम्स स्किनरनेदिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने त्याच्या खूप जुनी दारू असल्याचं सांगितलं. ही बॉटल ५० वर्षे जुनी असून त्याने कधी त्याला स्पर्शही केला नाही. मग आम्ही ती लिलावासाठी ठेवली. ही दारूची बाटली ५०-८० हजार डॉलर्स दरम्यान विकली जाईल अशी अपेक्षा होती. परंतु, ती १०६, २५० डॉलर्समध्ये विकली गेली. त्यांच्या मते, ही एक अत्यंत दुर्मिळ वाइन होती, ज्याची किंमत खूपच कमी होती.
जगात अशा दारूच्या फक्त १३०० बाटल्या आहेत…
खरंतर, पॉलसन हा व्यावसायिक चित्रकार होता. पण त्याला दुर्मिळ आणि खास प्रकारची वाईन साठवण्याचा छंद होता. ही बाटली एक जब्रोम आहे, ज्याला डबल मॅग्नमदेखील म्हणतात. ही १ बॉटल इतर वाईनच्या ४ वाटल्यांच्या बरोबरीची आहे. या वाईनच्या जगभरात फक्त १३०० बाटल्या तयार केल्या जातात.