Authored by अनंत साळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 May 2023, 8:04 pm

Jalna Ambad Ghungarde Hadgaon Villagers Hunger Strike : शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे हे या आमरण उपोषणाचे नेतृत्व करत असून जालन्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील शेकडो ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.

 

Farmers Hunger Strike
आठ महिने होऊनही अनुदान नाही, अखेर शेतकऱ्यांनी निवडला उपोषणाचा मार्ग

हायलाइट्स:

  • शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वात
  • तलाठ्याने प्रलंबित ठेवलेले शेत जमिनीचे शेकडो फेरफार तात्काळ मंजूर करावे
  • अतिवृष्टी अनुदान तात्काळ वाटप करावे या मागणीकरता उपोषण
जालना : मोसंबी फळाच्या अंबिया बहराचा मंजूर फळपीक विमा तात्काळ खात्यावर जमा करावा तसेच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केलेली शिफारस शासनाने मंजुर करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील शेकडो ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वात हे आमरण उपोषण करण्यात येत आहे. भाऊसाहेब मस्के, बप्पासाहेब मस्के, सोमनाथ तळतकर, किशोर पवार, जगन्नाथ चोरमले, रघुनाथ चोरमले, संतोष धावडे यांच्यासह घुंगर्डे हादगाव येथील शेतकऱ्यांनी उपोषणात सहभाग नोंदविला असून आपल्या मागण्या जोपर्यंत मंजूर होणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

पोलीस भरतीत महाघोटाळा, उमेदवारांकडून प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये घेतले, आमदाराचा खळबळजनक आरोप
ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून, शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी १० हजार रूपये देण्याची विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी राज्य सरकारला केलेली शिफारस तत्काळ मंजुर करावी, तसेच अतिवृष्टी अनुदान तात्काळ वाटप करावे, तलाठ्याने प्रलंबित ठेवलेले शेत जमिनीचे शेकडो फेरफार तात्काळ मंजूर करावे,या प्रमुख मागण्यांसह हे उपोषण करण्यात येत आहे.अतिवृष्टीमुळे मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नुकसाभरपाई पोटी शासनाने अनुदान जाहीर केले.मात्र ८ महिने होऊनही हे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही.हे अनुदान तात्काळ वाटप करा.अंबिया बहराचा मंजूर फळपीक विमा तात्काळ खात्यावर जमा करावा आदी मागण्यासाठी शेकडो ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.
Bus-Container Accident: आमचा अपघात झालाय; नातवाची आजोबांना फोनवरुन आर्त हाक; मामाच्या लग्नाला जाताना अनर्थ
आजचा उपोषणाचा दुसरा दिवस असून राज्य सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरकार या बाबतीत जेवढा उशीर करेल तेवढी या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा उपोषणग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here