हैदराबाद : तेलंगणची राजधानी हैदराबादमधील मदन्नापेट येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आईच्या अंतिम संस्कारासाठी विविध धर्माचे भाऊ-बहीण एकमेकांशी भिडले. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल होत भाऊ-बहिणीला शांत केले. प्रत्यक्षात आईच्या अंत्यसंस्कारासाठी मंगळवारी रात्री मुस्लिम मुलगी आणि हिंदू मुलामध्ये भांडण झाले. माहिती मिळताच अनेक लोक जमा झाले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर जमा झाल्याने पोलीस सक्रिय झाले. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि तासाभराच्या चर्चेनंतर पोलिसांनी या समस्येवर सौहार्दपूर्ण तोडगा काढला.

काय आहे संपूर्ण प्रकरण

त्याचे झाले असे, दरब जंग कॉलनीतील एका ९५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्याची मुले व नातू चादरगड येथे राहत होते. या महिलेच्या मुलीने २० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता. मुलीने युक्तिवाद केला की ती १२ वर्षांपासून तिच्या आईची काळजी घेत होती आणि आईने देखील इस्लाम स्वीकारला होता. या कारणास्तव, मुस्लिम रितीरिवाजांनुसारच आपल्या आईचे अंत्यसंस्कार झाले पाहिजेत. या मुलीने सांगितले की, तिच्या आईचीही हीच इच्छा होती.

IPL 2023: शुभमन गिलच्या बहिणीला ट्रोलर्सकडून बलात्कार, हत्येच्या धमक्या; महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
मुलीने माहिती देताना सांगितले की, मी १२ वर्षांपासून माझ्या आईची काळजी घेत आहे. बाकी कोणी तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. नुकतीच आईचे ऑपरेशनही झाले. त्यासाठी ५ लाख रुपये खर्चून शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातही कोणी मदत केली नाही. इस्लामी परंपरेनुसार अंतिम संस्कार करण्याची आईची इच्छा होती. मात्र मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांनी विरोध केला. दरम्यान, वृद्ध महिलेचा मृत्यू आणि अंत्यसंस्कारासाठी दोन्ही समाजातील लोकांनी रस्त्यावर गर्दी केल्यानंतर पोलिसांनी रात्रीच तेथे फौजफाटा तैनात केला.

CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्जचा IPL फायनलमध्ये जाण्याचा विक्रम, जाणून घ्या चेन्नई कितव्यांदा पोहोचला फायनलला?
पोलीस काय म्हणाले?

येथे कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण झाला नसल्याचे पोलीस उपायुक्त (दक्षिण पूर्व) रुपेश यांनी सांगितले. हा कौटुंबिक वाद असल्याचे त्यांनी सांगितले. हा वाद पोलिसांनी सामंजस्याने सोडवला. मुलीच्या इच्छेनुसार त्यांच्या घरी अंतिम प्रार्थना करण्यात आली. त्यांच्या इच्छेनुसार मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मुलाच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आता काही टेन्शन नाही. डीसीपीने सांगितले की भाऊ आणि बहिणीचा समझौता झाला आहे.

धक्कादायक! पती-पत्नी शेतात काम करण्यासाठी गेले, घरी परतलेच नाहीत, घटना समोर येताच संपूर्ण गाव हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here