कोल्हापूर : राज्यात वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू आहे. यात कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून महेंद्र कमलाकर पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत आहेत.कोल्हापूरचे सध्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची राज्य राखीव पोलीस दल क्र. एक पुणे येथे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात आज गृह विभागाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. एकूण पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर, पुणे, नांदेड, नाशिक शहर, अकोला येथे नवीन नियुक्ती देण्यात आले आहेत.

कोण आहेत महेंद्र पंडित?

कोल्हापूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून सध्या बृहन्मुंबई येथे पोलीस उपयुक्त पदावर कार्यरत असलेले महेंद्र कमलाकर पंडित यांची नियुक्ती करण्यात आली. ते २०१३मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आयपीएस अधिकारी आहेत.

UPSC परीक्षेत सलग दुसऱ्यांदा फडकवला कोल्हापूरचा झेंडा, रँकमध्ये सुधारणा करत शतक झळकवलं!
महेंद्र पंडित हे मूळचे सिन्नरचे असून त्यांनी पोलीस अधीक्षकपदाचे शिक्षण घेऊन नांदेड येथे दोन वर्ष पोलीस उपाधीक्षक पदावर काम केले आहे. २०१७ मध्ये त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली भागात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्य केले आहे. येथे दोन वर्षाच्या काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना २०१८ मध्ये पोलीस महासंचालनालय सन्मान पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. ते सध्या बृहन्मुंबई येथे उपायुक्त पदावर कार्यरत आहेत आणि त्यांची बदली आता कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.

Kolhapur News : अंबाबाईच्या भक्तांची अनोखी माया, आईच्या चरणी तब्बल पावणे दोन कोटींचं दान
यांची झाली बदली

१. महेंद्र कमलाकर पंडित – बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदावरून कोल्हापूर पोलीस अधीक्षकपदी बदली

२. शैलेश बलकवडे – कोल्हापूर पोलीस अधीक्षक पदावरून राज्य राखीव पोलीस दल गट क्र. १ पुणे येथे समादेशकपदी बदली

३. योगेश गुप्ता – पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई येथून पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नांदेड येथे बदली

४. मोनिका राऊत – अप्पर पोलीस अधीक्षक अकोला येथून पोलीस उपायुक्त नाशिक शहर येथे बदली

५. अभय डोंगरे – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथून अप्पर पोलीस अधीक्षक अकोला येथे बदली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here