नवी दिल्ली: अमेरिकेत लवकरच निवडणुका होत आहेत. २०१६ च्या निवडणुकीत पक्षपाती भूमिका घेण्याबाबतचा आरोप झालेले ट्विटर आणि फेसबुकने नवे नियम तयार केले. आता भारतातही फेसबुकच्या नियमांबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि एआयएमआयएमचे नेते यांनी फेसबुकच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी याबाबत ट्विट केले आहे. विविध लोकशाही देशांमध्ये फेसबुकचे वेगवेगळी मानके का आहेत?, हा कोणत्या प्रकारचा निष्पक्ष मंच आहे?, हा रिपोर्ट भाजपसाठी नुकसानकारक आहे- या वेळेला भाजपच्या फेसबुकशी असलेल्या संबंधाबाबतचा खुलासा झाला आहे आणि फेसबुकच्या कर्मचाऱ्यांवर भाजपच्या नियंत्रण करण्याच स्वभावही उघड झाला आहे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी देखील या मुद्द्यावर फेसबुकचे सीईओ यांना घेरले आहे. दिग्विजय सिंह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र यांचे समर्थक अंखी दास यांना फेसबुकमध्ये नियुक्त केले गेले. ते मुस्लिम विरोधी पोस्ट सोशल मीडियावर अप्रूव्ह करत असतात. या वरून तुम्ही हे सिद्ध केलेत की तुम्ही जो उपदेश करता त्याचे पालन करत नाही.’

वाचा-

खरे तर हा सर्व वाद एका इंग्रजी वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तानंतर सुरू झाला. भाजप नेता टी. राजा यांनी आपल्या पोस्टमध्ये रोहिंग्या मुस्लिमांना गोळी घालायला हवी असे म्हटले होते असे वॉल स्ट्रीट जनरलच्या वृत्तात म्हटले होते. त्यांनी या पोस्टमध्ये मुस्लिमांना देशद्रोही म्हणत मशीद पाडण्याची धमकी दिली होती. याचा विरोधा फेसबुकच्या कर्माचाऱ्यांनी केला होता हे कंपनीच्या नियमांच्या विरोधी असल्याचे म्हटले होते. मात्र, कंपनीने भारतात बसणाऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नव्हती. यानंतर असदुद्दीन ओवेसी आणि दिग्विजय सिंह यांनी फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले.

वाचा ही बातमी: वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here