धाराशिव : पाडाचा अंबा खायला देण्याच्या बहाण्याने ८ वर्षीय चिमुकलीवर ४० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटणा भूम तालुक्यात घडली आहे. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरली असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.पीडित चिमुकलीचे कुटुंब आणि आरोपीचे गेल्या ५ ते ६ वर्षांपासून जिव्हाळयाचे संबध होते. काल सकाळी ९ वाजता आरोपी पीडीत चिमुकलीच्या घरी आला. घरचे पाडाचे आंबे देतो, तुमच्या दिदीला सोबत पिशवी घेऊन पाठवा असे त्याने तिच्या कुटुंबीयांना सांगितले. आरोपीचे रोजचे घरी येणे जाणे असल्यामुळे आईने व आजोबाने विश्वासाने चिमुकलीला आरोपी सोबत पाडाचे आंबे आणायला पाठवले.

साताऱ्यात प्रतीक्षाचीच चर्चा, ना क्लास, ना कोणती अकॅडमी, घरीच केला अभ्यास, UPSC त मोठे यश
बराच वेळ झाला म्हणून आई व आजोबाने आरोपीचे घर गाठले. परंतु आरोपी चिमुकलीला घरी आढळले नाहीत. काळजीने आई व आजोबांनी अख्खे गाव धुंडाळले. बराच वेळानंतर आरोपी चिमुकलीला घेऊन येताना दिसला. एवढा वेळ का लागला ? असे चिमुकलीच्या आईने आरोपीला विचारले असता शेतात आंबे आणायला गेलो होतो. असे आरोपीने सांगुन पळ काढला.

मुलगा हिंदू, मुलगी मुस्लीम, मग मृत आईचा धर्म कोणता?; भाऊ- बहीण आपसात भांडले, शेवटी अंत्यसंस्कार असे झाले
आईने घरी आल्यानंतर चिमुकलीला विश्वासात घेऊन विचारले असता मुलीने शेतातील घडलेला प्रसंग सांगितला. घडलेली हकिकत ऐकून आईच्या तोंडचे पाणी पळाले. रात्री मुलीचे वडील घरी आल्यानंतर त्यांना तिने घडलेला प्रसंग सांगितला. काल रात्री पीडित मुलीच्या आईने भूम पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरुध्द तक्रार दिली. त्यानंतर आरोपीच्या विरुध्द विविध संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला काल रात्री अटक केली असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे हे करत आहेत.

IPL 2023: शुभमन गिलच्या बहिणीला ट्रोलर्सकडून बलात्कार, हत्येच्या धमक्या; महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here