वॉशिंग्टन: इराणबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे आज अमेरिकेन जनतेशी संवाद साधणार आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ९.३० वाजता ते संवाद साधणार असल्याने ट्रम्प काय घोषणा करतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. ट्रम्प यांच्या या भाषणाची विस्तृत माहिती वाचा…

> युरोपीयन देशांनी इराणविरोधात एकत्र यायला हवे; ट्रम्प यांचे आवाहन

> सुलेमानी यांना दहशतवाद्यांनी पाठबळ दिलं. अमेरिकन नागरिकांना जीव धोक्यात होता. म्हणूनच त्याच्याविरोधात कारवाई केलीः ट्रम्प

> इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही; ट्रम्प यांचा निर्धार

> इराणला थांबवण्यासाठी इराणवर आर्थिक निर्बंध घालणार; ट्रम्प यांचा इशारा

> सुलेमानी अमेरिकेतील काही ठिकाणांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच आम्ही त्याला मारलं; ट्रम्प यांचं वक्तव्य

> इराणच्या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या तळाचे थोडे नुकसान झाले आहे; ट्रम्प यांची माहिती

> इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे सर्व सैनिक सुरक्षित; ट्रम्प यांचा दावा

> अमेरिकेच्या महिला आणि पुरुष जवानांनी दाखवलेले धाडस अतुलनीयः डोनाल्ड ट्रम्प

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here