सुरेश कुळकर्णी । जालना

‘पवार कुटुंबाच्या दोन पिढ्यांना मी ओळखतो. त्यांचं कुटुंब आदर्श कुटुंब आहे. त्यांच्यात जे काही प्रश्न असतील, ते एका मिनिटात सुटतील,’ असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री यांनी व्यक्त केला आहे.

जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात टोपे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पवार कुटुंबातील कथित वादावर भाष्य केलं. ‘पवार साहेब हे जेष्ठ नेते आहेत. त्या अधिकाराने ते काही बोलले असतील तर तो त्यांचा घरातला मुद्दा आहे. त्यांच्या कुटुंबात केवळ एकोपा आहे, दुसरं काहीही नाही. अनेकदा अशा पद्धतीनं घरातल्या सदस्यांशी बोलत असतात. अजितदादांना मी चांगला ओळखतो. पार्थ माझा जवळचा मित्र आहे. ते एकत्र बसून एका मिनिटात प्रश्न मिटवतील, असं टोपे म्हणाले. मीडियाने अथवा कुणीही या सगळ्याला वेगळे वळण देऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

वाचा:

शरद पवार व हे दोघे भेटणार आहेत काय, असं विचारलं असता ‘त्यात काहीच अडचण नाही. ते लवकरच भेटतील,’ असं टोपे म्हणाले.

पुरावे द्या, चौकशी होईल!

करोनाच्या काळात बदल्या करताना मोठा आर्थिक व्यवहार झाला असून त्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर बोलताना टोपे म्हणाले, ‘त्यांनी तसे पुरावे द्यावेत, चौकशी होईल. तसा कायदाच आहे.’

वाचा:

सरकारचं चांगलं चाललंय!

‘आघाडी सरकारचे खूप चांगले चालले आहे. सगळे जण व्यवस्थित काम करत असून हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. सरकार कोसळण्याच्या विरोधकांच्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे टोपे म्हणाले.

खासगी दवाखान्यावर नर्सिंग अॅक्टनुसार कारवाई

खासगी दवाखाने करोना रुग्णांना उपचार नाकारत असतील तर त्यांच्यावर बाॅम्बे नर्सिंग अॅक्टनुसार कारवाई केली जाईल. अशा दवाखान्यांचे परवाने रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे. खासगी दवाखान्यांनी सेवा दिलीच पाहिजे,’ असं टोपे यांनी ठणकावून सांगितलं.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here