मुंबई: डॉक्टरपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं असं वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार हे भाजपच्या टीकेच्या रडारवर आले आहेत. संजय राऊत यांनी हे वक्तव्य करून करोना योद्ध्यांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी,’ अशी मागणी भाजपनं केली आहे.

‘जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. (World Health Organization
– WHO) म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळंच करोना वाढलाय,’ असं वक्तव्य राऊत यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं.

वाचा:

करोनाच्या काळात जीव धोक्यात घालून डॉक्टर करत असलेल्या कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वेळोवेळी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. करोना योद्धे म्हणून त्यांचा गौरव केला आहे. असं असताना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे.

वाचा:

राऊत यांच्या या वक्तव्याला भारतीय जनता पक्षानं तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘करोनाच्या संकटात डॉक्टर हे देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल राऊत यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे डॉक्टरांचा फार मोठा अपमान आहे. त्यामुळं राऊत यांनी राज्यातीलच नव्हे देशातील डॉक्टरांची जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here