मुंबई: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येईल. तत्पूर्वी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची सविस्तर आकडेवारी आणि तपशील मांडण्यात आला. त्यानुसार बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळांमध्ये नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकणातून सर्वाधिक म्हणजे ९६.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर मुंबई विभागातून सर्वाधिक कमी म्हणजे ८८.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय, बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. नियमित विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९३.७३ टक्के इतके आहे. तर परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ८९.१४ टक्के इतके आहे.

Maharashtra HSC Result: बारावीचा निकाल जाहीर,मुलींनी यंदाही मारली बाजी, जाणून घ्या निकालाची वैशिष्ट्ये

बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ३५८७९ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५५८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५७७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४४.३३ आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्याथ्र्यांची एकूण संख्या ३६४५४ एवढी असून ३५८३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९५२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८२.३९ आहे.

Maharashtra HSC Result 2023: बारावीचा निकाल कुठे, कसा तपासायचा?

कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के लागला?

पुणे- ९३.३४
नागपूर- ९०.३५
औरंगाबाद- ९१.८५
मुंबई- ८८.१३
कोल्हापूर- ९३.२८
अमरावती- ९२.७५
नाशिक- ९१.६६
लातूर- ९०.३७
कोकण- ९६.०१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here