नाशिकः जिल्ह्यातील वणी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या १४ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वणी येथील कड गल्लीत राहणारे एस. टी. महामंडळाचे कर्मचारी प्रकाश गावित यांची मुलगी नेहा (१४) हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.आधी उलटीचा त्रास, मग प्रकृती बिघडली
सोमवारी २२ मे रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास नेहाला उलटीचा त्रास झाला. उलट्या झाल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. छातीमध्ये जास्त वेदना होऊ लागल्याने नातेवाईकांनी तातडीने तिला जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता प्रकृती चिंताजनक वाटल्याने दुसऱ्या खासगी रुग्णालयात पाठविले.

दरम्यान, दुसरा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला तपासले असता नेहा हिचा मृत्यू झाला होता. नेहाला उपचार मिळण्याआधीच तिची प्राणज्योत मलावल्याने तिच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. तिचा तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नेहा ही वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होती.
हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामध्ये आता अगदी कमी वयाच्या लोकांचा देखील समावेश आहे. ३५ ते ४० वर्षावरील अनेक लोकांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन होत आहे. परंतु, १४ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.