वाचा-
धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच सुरेश रैनाने देखील निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. खर तर रैनाला आणखी क्रिकेट खेळायचे होते. गेल्या वर्षी रैनाच्या गुढघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रैना प्रयत्न करत होता. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर टी-२० वर्ल्डकपमधील भारतीय संघाची निवड होणार होती. त्यामुळे धोनी प्रमाणे रैनाचा देखील चांगली कामगिरी करून भारतीय संघात प्रवेश करण्याचा प्रयत्न होता.
वाचा-
गेल्या काही दिवसात सोशल मीडियावरील लाइव्ह चॅटच्या माध्यमातून रैनाने त्याची भारतीय संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर फक्त १५ मिनिटात रैनाने देखील निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.
चैन्नईला रवाना होण्याआधी रैनाने यासंदर्भात कुटुंबातील कोणाशीही चर्चा केली नाही. शनिवारी दुपारी कुटुंबातील सदस्यांशी त्याचे बोलने झाले होते. पण याबाबत तो काहीच बोलला नव्हता. संध्याकाळी धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर रैनाने १५ मिनिटात निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. त्याच्या या निर्णयाने कुटुंबातील सदस्य देखील हैराण झाले. पण सर्वांना माहित होते की धोनी आणि रैना यांची मैत्री ही शोले चित्रपटातील जय-वीरू यांच्या प्रमाणे आहे.
वाचा-
धोनी आणि रैना दोघांनी एकत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता हे दोघे चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून एकत्र खेळतील. रैना हा धोनीच्या अधिक जवळ होता. धोनीशी अधिक भावनिक जवळीक असल्यामुळे रैनाने त्याच्या सोबत निवृत्ती घेतील.
वाचा-
रैनाने भारताकडून २२६ वनडे, ७८ टी-२० आणि १८ कसोटी सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये रैनाने अनेक वेळा एकहाती चेन्नईला सामना जिंकून दिला आहे. या स्पर्धेत त्याने १९३ सामन्यात ५ हजार ३५६ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३३.३४ असून स्ट्राईक रेट १३७.१४ इतका आहे. आयपीएलमध्ये रैनाने एक शतक आणि ३८ अर्धशतक झळकावली आहेत. २८ वेळा नाबाद राहिलेल्या रैनाने आयपीएलमध्ये ४९३ चौकार आणि १९४ षटकार मारले आहेत. २०१९च्या आयपीएलमध्ये त्याने १७ सामन्यात ३८३ धावा केल्या होत्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times