जळगाव : ना जमीन.. ना ..स्वत:चे घर…दाम्पत्याने मोल मजुरी केली. मुलांच्या शिक्षणात कमी पडू नये म्हणून आईने लोकांच्या घरी जावून धुणी भांडी केली आणि मुलांना शिकवंल आणि मोठ केलं. मात्र आई वडीलांच्या मोल मजुरीची, कष्टांच त्यांच्या दोन्ही मुलांनी चीज केल आहे. अंत्यत प्रतिकूल परिस्थिती अभ्यास आणि मेहनत करत दोन्ही मुलांनी अंगावर खाकी चढवत, आई वडीलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. मोठ्या मुलाची मुंबई पोलीस दलात तर दुसऱ्या लहान महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाली आहे. जामनेर तालुक्यातील पहूरपेठ येथील सुभाष मोरे आणि मीराबाई मोरे हे दाम्पत्य आणि त्यांची गौरव व सारनाथ या मुलांच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील शिवनगरात सुभाष मोरे, मीराबाई मोरे आणि दोन मुले, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. सुभाष मोरे हे पेठ ग्रामपंचायतीत कर्मचारी आहेत. सुभाष मोरे यांचा पगार जेमतेम, या पगारात कुटुंबांचा उदरनिर्वाह करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सुभाष ग्रामपंचायतीच्या कामाव्यतिरिक्त मजुरी करायचे. अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरात मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करायचे, जर ते शिकले नाही, त्यांचे भविष्य काय, आपल्या प्रमाणे आपल्या मुलांवर वाईट दिवस येवून नये, हा विचार सुभाष मोरे आणि त्यांची पत्नी मीराबाई या दोघांना नेहमी सतावत असे.

मुलांच्या उज्ज्वल भविष्यांसाठी मीराबाईंनी खोचला पदर..तब्बल १५ वर्षांपासून लोकांकडे धुणीभांडी

मोरे दामपत्य भुमीहीन,स्वतः चे राहण्यासाठी जागा नाही. सध्या चे घर आहे ते शासकीय घरकुल आहे. परीस्थिती जेमतेम असल्याने रोजच्या दोन घासाचा प्रश्न आ..वासून दररोज उभा राहायचा. असंख्य अडचणी आल्या, मात्र दाम्पत्याने कुणापुढेही मदतीसाठी हात पसरला नाही. त्यांच्या मदतीसाठी कोणी पुढे सुध्दा आलं नाही. अखेर मुलांच्या शिक्षणासाठी मीराबाईंनीही पदर खोचला आणि त्या मजुरीसाठी घराबाहेर पडल्या. लोकांच्या घरी धुणीभांडी करत त्यांनी उदरनिर्वाहाला हातभार लावला. तब्बल १५ वर्ष मीराबाईंनी लोकांच्या घरी जावून धुणीभांडींच काम केलं. या कामाच्या आधारावर दोन्ही मुले गौरव आणि सारनाथ या दोघांचे शिक्षण पूर्ण केलं. तर, मुलांचे शिक्षण नाहीतर त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह सुध्दा केला.

मोठ्या मुलासाठी गावातील अभ्यासिका बनली आधार…रात्रंदिवस अभ्यास फक्त जेवणाला यायचा घरी…

मुलांची शिकून साहेब व्हावं, शासकीय नोकरी करावी असं आईचं स्वप्न होतं. दोघांपैकी एका मुलाने पोलीस दलात नोकरी करावी, अशी सुध्दा मिराबाई यांची इच्छा होती. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत, मुलांनीही आपल्या आईच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास आणि मेहनत केली. मोठा मुलगा सारनाथ याने बारावी उत्तीर्ण होत पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सारनाथ याने राज्य राखीव दलाची २०१९ परीक्षा दिली. यात अपयश आले. पण त्याने जिद्द सोडली नाही. २०२२ मध्ये सीमा सुरक्षा दलात निवड झाली. पण,आईचे पोलीस दलात जाण्याचे स्वप्न होते. पोलीस होण्याचे ध्येय सारनाथ याला स्वस्थ बसू देत नव्हते.

सकाळ व संध्याकाळ दोन तास मैदानी चाचणी व रात्रंदिवस सरस्वती अभ्यासिका केंद्रात सारनाथ अभ्यास करायचा. फक्त जेवणासाठी तेवढ सारनाथ हा घरी जायचा. घरी व परीसरात अभ्यासासाठी अनुकूल वातावरण नसल्याने अभ्यासिका आधार बनली.
HSC Results 2023: कोकणातील पोरं हुश्शार, बारावीच्या परीक्षेत बाजी, मुंबईत सर्वाधिक कमी निकाल

मोठा मुलगा म्हणतो …बाबासाहेबांचा संदेश आम्हा भावंडासाठी प्रेरणादायी ठरला

सराव आणि अभ्यासात सातत्य कामय ठेवले. या जोरावर सारनाथ याने १७ मे २०२३ रोजी याला यश मिळालं अन् त्याची मुंबई पोलीस दलात निवड झाली. गौरव याचीही पहिल्याच प्रयत्नात गृहविभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाली आहे. नुकतेच त्याने पुणे जिल्ह्यातील दौंड येथे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा मौलिक सल्ला दिला आहे. यानुसारच सारनाथ व गौरव या दोघांनी जगण्याचा संघर्ष सुरू केला. गौरव आणि सारनाथ भावंडांनी या दोघांनी वेळेप्रंसगी मोल मजूरी केली आणि घरात आई वडीलांना आर्थिक हातभार लावायचे. बाबासाहेबांचा संदेश आम्हा भावंडासाठी प्रेरणादायी ठरला असल्याचे सारनाथ याने सांगितले आहे.
Maharashtra HSC Result 2023 : यंदा बारावीच्या निकालाचा टक्का का घसरला? बोर्डानं थेट कारण सांगितलं
एक नव्हे दोन्ही मुलांनी आपल्या कष्टांच चीज केलं, आणि स्वप्न पूर्ण केल्याचा मोठा आनंद आणि अभिमान असल्याचे मीराबाई ह्या सांगतात. परिस्थिती कशीही असो मात्र जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वास असला ही यश हमखास मिळतं,हे सारनाथ आणि गौरव या दोन्ही भावंडांनी दाखवून दिलं असून अंगावर खाकी चढवली आहे. याद्वारे सारनाथ व गौरव या दोघा भावंडांनी इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.
Maharashtra HSC Result: बारावीचा निकाल जाहीर,मुलींनी यंदाही मारली बाजी, जाणून घ्या निकालाची वैशिष्ट्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here