पाटणा: बिहारच्या हाजीपूरमध्ये नऊ वर्षांच्या मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये मृत तरुणीच्या मोठ्या बहिणीसह तिच्या प्रियकराचा समावेश आहे. आरोपींनी मुलीला अतिशय निर्घृणपणे संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी घटनेचा तपास करत पोलिसांनी मृत मुलीच्या मोठ्या बहिणीला अटक केली. आरोपी मुलगी १३ वर्षांची आहे. तिनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं लहान बहिणीला संपवलं. जवळपास चार दिवस तिचा मृतदेह खोक्यात लपवला होता. आपण पकडले जाऊ या भीतीनं दोन्ही आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यानंतर ऍसिड ओतून ते पेटवून दिले. १९ मे रोजी घडलेल्या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब आणि श्वानपथकाची मदत घेतली. यातून प्रकरणाचा छडा लागला. मृत मुलीच्या मोठ्या बहिणीचं वय केवळ १३ वर्षे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवी रंजन कुमार यांनी दिली. आरोपी मुलीचे गावातील एका मुलाशी प्रेमसंबंध होते. १५ मेच्या रात्री लहान बहिणीनं दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. ताई, तू काय करतेस, अशी विचारणा तिनं केली. लहान बहिणीनं याबद्दल कोणाकडे वाच्यता केल्यास आपण अडचणीत येऊ, अशी भीती दोघांना वाटली. त्यामुळे दोघांनी मिळून ९ वर्षीय मुलीला संपवलं आणि तिचा मृतदेह खोक्यात ठेवला. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपी बहीण आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. त्यांच्यासोबत मुलीच्या काकीलादेखील अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात तिचाही हात असल्याचं आढळून आलं आहे. ९ वर्षांची चिमुकली १६ मे रोजी बेपत्ता झाली. तिचा मृतदेह १९ मे रोजी तिच्या घराच्या मागे असलेल्या झुडूपात आढळला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here