मुंबई: यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेल्या वादात आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार यांनी उडी घेतली आहे. पार्थ पवार राजकारणात आहे. तो १८ वर्षाचा आहे. त्याने लोकसभा निवडणूक लढवलीय. त्यामुळे तो परिपक्वच आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला. पार्थ पवार १८ वर्षाचा आहे. तो राजकारणात आहेत. शिवाय त्याने निवडणूकही लढवली आहे. त्यामुळे तो परिपक्व आहेत, असं नारायण राणे म्हणाले. पार्थ यांनी केलेल्या मागणी मागे त्यांचे स्वत:चे म्हणून काही विचार असतील. त्यामुळेच त्यांनी हे विधान केलं असेल, असंही राणे म्हणाले.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मी कधीच पर्यावरण मंत्री यांचं नाव घेतलं नाही. मीडियानेच त्यांचं नाव घेतलं आहे. सुशांतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने त्यावर निर्णय घ्यावा. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत बोलत आहेत. आदित्यचा याप्रकरणाशी संबंधच नाही तर राऊत का बोलत आहेत?, असा सवाल करतानाच राऊत वारंवार बोलत असल्यानेच या प्रकरणात संशय अधिक वाढला आहे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

काय म्हणाले होते पवार?

दरम्यान, सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी पार्थ यांनी केली होती. तसं पत्रंही त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं. त्यावर वाद निर्माण झाल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत देत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असं पवार म्हणाले. तसेच कुणाला सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करायची असेल तर आमचं काही म्हणणं नाही. कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्याला विरोध असण्याचं कारणही नाही. मात्र, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं. एखाद्याने आत्महत्या केली तर त्यावर दु:ख होते. पण या प्रकरणाची ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, त्याचं आश्चर्य वाटतं, असं सांगतानाच या प्रकरणात कुणी कुणावर काय आरोप केले या खोलात जायचं नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here