पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे शहर प्रभारी म्हणून अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड शहराच्या प्रभारी म्हणून वर्षा डहाळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वी नियुक्ती देण्यात आलेले राजे पांडे यांना आता पुणे ग्रामीण आणि मावळचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने पुणे जिल्ह्यासाठी भाकरी फिरवण्यास सुरुवात केली आहे.राज्यात भाजपची ताकत वाढावी यासाठी बावनकुळे यांच्याकडून विभाग आणि जिल्हा प्रभातीच्या नियुक्त्या आज करण्यात आल्या आहेत. यात १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १५ चिटणीस यासह कोषाध्यक्ष, संघटन मंत्री यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारात पुण्याला दोन मंत्रिपद? या तीन नेत्यांमध्ये जोरदार चुरस
भाजपकडून आता नवीन दोन विभाग करण्यात येणार आहेत. त्यात उत्तर पुणे जिल्हा आणि दक्षिण पुणे जिल्हा असे विभाग करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन जिल्हाध्यक्ष देखील निवडले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, हवेली, मावळ या तालुक्यांचा उत्तर पुणे जिल्ह्यात समावेश होतो. तर मुळशी, भोर, वेल्हे, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर हे तालुके दक्षिण विभागात येतात.

पुण्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाईचा हातोडा; ‘पीएमआरडीए’ची रेस्टॉरंट्सवर कारवाई
निवडणुकीच्या पार्श्भूमीवर भाजपने आपली पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यात बारामती, शिरूर आणि मावळ या मतदारसंघांवर भाजपकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. भाजपने आपली ताकत वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. याचा भाजपला किती फायदा होतो? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here