या अत्याचारात बळी गेलेल्या या मुलीच्या वडिलांनी माहिती देताना सांगितले की, त्यांची मुलगी शुक्रवारपासून बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. त्यानंतर एका उसाच्या शेतामध्ये मुलीचे शव सापडले. आपल्या मुलीचे डोळे बाहेर आले होते, शिवाय तिची जीभ देखील कापून टाकण्यात आली होती, अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली.
राजधानी लखनऊहून १३० किमी अंतरावर नेपाळला लागून असलेल्या लखीमपूर खीरी येथे हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची भावना आहे. या मुलीसोबत बलात्कार झाल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या मुलीचे डोळे बाहेर येणे आणि जीभ कापण्याबाबतचा तिच्या वडिलांचा दावा मात्र पोलिसांनी फेटाळून लावला. शवविच्छेदन अहवालात फक्त बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे लखीमपूर खीरीचे पोलीस अधीक्षक सत्येंद्र कुमार यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध बलात्कार, आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेबाबत उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी दु:ख जाहीर करत ही घटना शरमेची असल्याचे म्हटले आहे. लखीपपूर खीरीत दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या होणे ही अतिशय दु:खद आणि लज्जास्पद घटना असल्याचे त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशात अशा घटना घडताना पाहून समादवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये काही फरक राहिलेला नाही, असेही मायावती म्हणाल्या.
वाचा-
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी देखील या घटनेनंतर योगी सरकारला घेरले आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना दलितांवरील अत्याचार शिगेला पोहोचले आहेत, असे चंद्रशेखर आझाद यांनी ट्विट करत म्हटले आहे. लखीमपूर खीरी येथे एका दलित अल्पवयीन मुलीवर अत्याचारासह तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे सांगत, जर हे जंगलराज नसेल तर मग जंगलराज कशाला म्हणतात, असा सवाल आझाद यांनी उपस्थित केला आहे.
वाचा:
आमच्या मुली सुरक्षित नसून आमची घरे देखील सुरक्षित नाहीत. जेथे पाहावे तेथे भयाचे वातावरण आहे, असेही आझाद पुढे म्हणाले.
वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times