नवी दिल्ली : यांचे पापुआ न्यू गिनी या देशाने अभूतपूर्व स्वागत केले. सूर्यास्तानंतर येणाऱ्या कोणत्याही नेत्याचे पापुआ न्यू गिनीमध्ये समारंभपूर्वक स्वागत होत नाही. मात्र, मोदी त्याला अपवाद होते. त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. एवढंच नव्हे तर यांनी नरेंद्र यांना वाकून नमस्कार करत भारतीयांची मनं जिंकली. जेम्स मरापे यांच्या या कृतीची संपूर्ण जगभर चर्चा होत आहे. आता दस्तुरखुद्द जेम्स मरापे यांनीच मोदींना वाकून नमस्कार करण्याचं कारण सांगितलं आहे.पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान काय म्हणाले…?‘आपण अशा समाजातून येतो जिथे मोठ्यांचा आदर करण्याची परंपरा आहे. आपल्याकडे दररोज पाहुणे येत नाहीत आणि स्वागतही दररोज होत नाही. पण पाहुण्यांच्या स्वागताची ही एक जुनी संस्कृती आहे. ज्यामध्ये आपण मानतो की ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. पंतप्रधान मोदी मोठे आणि ज्येष्ठ आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत ते सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रमुख आहेत. ते पापुआ न्यू गिनी देशाकडे दुर्लक्ष करु शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी या देशाला भेट दिली. अशा स्थितीत मी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी गेलो होतो.मोदींच्या शैलीने भारतीय प्रभावित झालेत. पीएम मोदी हे लोकांचे नेते आणि आध्यात्मिक व्यक्ती आहेत. त्यांच्या संस्कृतीत ज्येष्ठांचा आदर करणे आवश्यक आहे. मोदी हे केवळ एक नेते नाहीत तर ते वरिष्ठ नेतेही आहेत. भारताचा उदय आणि पापुआ न्यू गिनीसारख्या छोट्या राष्ट्रांसह उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेपर्यंत पोहोचण्याची क्षमता याला एक अद्वितीय देश बनवते. त्याचमुळे मी त्यांना वाकून नमस्कार केला.परदेशातही ‘हर हर मोदी’ गजर!रविवारी पापुआ न्यू गिनी येथे आगमन झाले. पोर्ट मोर्सबी विमानतळावर गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी मरापे यांनी मोदी यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद मागितला. पापुआ न्यू गिनीला भारतीय पंतप्रधानांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. सूर्यास्तानंतर येणाऱ्या कोणत्याही नेत्याचे पापुआ न्यू गिनीमध्ये समारंभपूर्वक स्वागत होत नाही. मात्र, मोदी यांचा अपवाद करण्यात आला आणि त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. या वेळी मोदी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ही देण्यात आला.