CNG-PNG च्या किमती
सीएनजी आणि पीएनजी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा पहिल्या आठवड्यात बदलतात. पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबईत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गॅसच्या किमतीत बदल करतात. जूनच्या सुरुवातीला सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात दिल्ली NCR मध्ये CNG आणि PNG च्या किमती कमी झाल्या होत्या. सीएनजी-पीएनजीच्या किमती जूनमध्ये बदलण्याची शक्यता आहे.
गॅस सिलेंडरची किंमत
गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याच्या सुरुवातीला बदलतात. एलपीजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती एप्रिलमध्ये कमी करण्यात आल्या होत्या. कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरची किंमत ९२ रुपयांपर्यंत कमी केली होती. मे महिन्यातही एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती. १ मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ही कपात करण्यात आली होती. या कपातीनंतर राजधानी दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १,८५६.५० रुपयांवर आली आहे. यामध्ये १७१.५० रुपयांची घट झाली आहे.
यापूर्वी त्याची दिल्लीत किंमत २,०२८ रुपये इतकी होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. हा सिलिंडर दुकानात वापरला जातो. मात्र, घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यात शेवटची १ मार्च रोजी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
इलेक्ट्रिक टू व्हीलर होत आहेत महाग
भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी १ जून २०२३ पासून महाग होणार आहेत. २१ मे रोजी जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, अवजड उद्योग मंत्रालयाने FAME-II अनुदानाच्या रकमेत बदल करत ती १०,००० रुपये kWh इतकी केली आहे. पूर्वी ती १५,००० रुपये प्रति kWh होती. यामुळे, बहुतेक इलेक्ट्रिक वाहने सुमारे २५,००० ते ३५,००० रुपयांनी महाग होऊ शकतात.