पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत चौहान यांना श्रद्धांजली वाहिली. चेतन चौहान हे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. तसेच ते मेहनती राजकीय नेते होते. त्यांनी उत्तर प्रदेशात सार्वजनिक सेवा आणि भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. आपण त्यांच्या निधनाने दु:खी झालो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.आपण त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दु:खात सहभागी असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील ट्विट करत चेतन चौहान चौहान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी चेतन चौहान यांचा अकाली मृत्यू झाल्याचे वृत्त समजले. प्रभू श्रीराम त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
नक्की वाचा-
केंद्रीय गृहमंत्री यांनी देखील चेतन चौहान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. चेतन चौहान यांच्या निधनाने राजकारणाचे आणि खेळ अशा दोन्ही क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिले आहे.
नक्की वाचा-
गृहमंत्री अमित शहा हे देखील करोनाची लागण झाल्यानंतर मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते. काही दिवसांपू्र्वीच बरे होऊन ते घरी आले आहेत. सध्या ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.
ही बातमी देखील वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Thank you ever so for you article post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.