अहमदाबाद: आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आज जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहेत. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी खेळणार आहे तर पराभूत संघाचा प्रवास इथेच संपेल. गुजरात आणि मुंबई या मोसमात दोनदा आमनेसामने आले आहेत. दोघांनीही प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे.त्यामुळे आजचा सामना चांगलाच अटीतटीचा होणार आहे. पण या सामन्यात जर पावसाने हजेरी लावली तर पुढे काय होणार? सामना खेळवला जाणार की कोणता संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचणार पाहूया.सामन्यादरम्यान हवामान चांगले राहण्याची अपेक्षा आहे, परंतु क्वालिफायर २ साठी राखीव दिवस नसल्यामुळे पाऊस पडला तर काय? मग विजेता कसा ठरवला जाईल? स्पर्धेतील दुसरा अंतिम फेरीचा संघ कसा ठरवला जाईल, चला जाणून घेऊया.

रोहित शर्माने वाढवलं मुंबई इंडियन्सचं टेन्शन, एलिमिनेटर तर जिंकली पण पुढे काय होणार?
२६ मे रोजी खेळवला जाणार क्वालिफायर-२ पावसामुळे सुरू झाला नाही किंवा अनिर्णित राहिला, तर गुजरात टायटन्सला या सामन्याचा विजेता म्हणून घोषित केले जाईल कारण हा संघ पॉइंट टेबलवर मुंबई इंडियन्सपेक्षा पुढे आहे. मुंबई इंडियन्स १६ गुण आणि -०.०४४ नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्स +.८०९ आणि २० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. मात्र, पावसाची शक्यता नगण्य असल्याने या समीकरणाची गरज भासणार नाही.

कोणाचा पलडा भारी

यंदाच्या मोसमात मुंबईच्या कामगिरीत चढ-उतार होत असले तरी आता योग्य वेळी त्याचा संघ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामी जोडीसह कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड आणि युवा फलंदाज नेहल वढेरा यांनी आतापर्यंत आव्हाने चांगल्या प्रकारे पेलली आहेत. तर तिलक वर्माही मोक्याच्या क्षणी येत संघासाठी शानदार फ़ाटेकबजी करत आहे.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

या फलंदाजांसमोर गुजरातच्या गोलंदाजांची कठोर परीक्षा होईल, ज्याचे नेतृत्व अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी करत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर गुजरात टायटन्स या सामन्यात प्रवेश करेल. सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. शुभमन गिलने गुजरात टायटन्सच्या फलंदाजीची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here