चेन्नई: इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपरजायंट्सवर ८१ धावांनी विजय मिळवला. यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आकाश मधवाल स्वत:ला जसप्रीत बुमराहचा पर्याय मानत नाही. संघाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यात त्याला आनंद आहे, असं त्याने सांगितलं. उत्तराखंडचा इंजिनीअर मधवालने बुधवारी ३.३ षटकात पाच धावा देत पाच बळी घेत मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या एक पाऊल आणखी जवळ नेले.सामन्यानंतर मधवाल म्हणाला, ‘संघाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी बुमराहचा पर्याय नाही. पण, माझ्याकडून जे काही होईल ते करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीने चालू हंगामात वेगवान गोलंदाजांना फारसा फायदा दिला नाही, परंतु मधवालने सांगितले की त्यांच्यासाठी काय फायद्याचं ठरलं.

Sachin Tendulkar: मुंबई इंडियन्ससोबत घडलं ते पाहून सचिनचा पारा चढला, लखनऊविरुद्धच्या सामन्यात…
मधवाल म्हणाला, ‘चेपॉकची विकेट चांगली होती. चेंडू थांबून येत नव्हता तर तो वेगाने बाहेर पडत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. मी एक स्विंग गोलंदाज आहे आणि कठीण लेंथवर गोलंदाजी करून विकेट मिळवण्याचा प्रयत्न करतो.

Akash Madhwal: जवानाचं पोरगं बनलं मुंबई इंडियन्सच्या विजयाचं शिल्पकार, आकाशच्या वादळात लखनऊची दाणादाण
मधवाल म्हणाले की कर्णधार रोहित शर्माला माहित आहे की त्याचे स्ट्राँग पॉईंट काय आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा. “यॉर्कर हा माझा स्ट्राँग पॉईंट आहे हे रोहितला माहित होते. पण, नेट सेशन आणि सराव सामन्यांदरम्यान त्याला कळले की मी नवीन चेंडूनेही गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे त्यांना माहिती होतं की कुठल्या परिस्थितीत माझा कसा वापर करुन घ्यायचा आहे” असे मधवाल म्हणाला.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातही नवीन उल हकला प्रेक्षकांनी डिवचलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here