जळगाव: जळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात एका महिलेने एकाचवेळी तीन मुलींना जन्म दिला आहे. यात एक सर्वसामान्य पण जन्माला असून इतर दोन जुळ्या असून त्या एकमेकांना शरीराने जुळलेल्या आहेत. त्यांना एकच हृदय व दोन हात, दोन पाय आहेत. दरम्यान जुळलेल्या या दोन्ही मुले जळगावात चर्चेचा विषय ठरला आहे. सध्यस्थितीत दोघेही जुळलेल्या मुली सुखरुप असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.जळगाव शहरातील माहेर असलेली विवाहिता मध्यप्रदेशात वास्तव्यास आहे. या विवाहितेला एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीला गर्भधारणा राहिली, तिच्यावर जळगावातील नवाल हॉस्पिटल, याठिकाणी डॉ. सुदर्शन नवाल यांच्याकडे उपचार सुरु होते. तिची तपासणी केली, त्यावेळी तिच्या गर्भात तीन बाळ असल्याचे दिसून आले. त्यातील दोघींना एकच धड असून मानेपासून दोघांचे डोके वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. तिसरा गर्भ मात्र सुरक्षित असल्याचेही तपासणीत निदान झाले. निदानानंतर डॉक्टरांनी विवाहितेच्या पतीसोबत चर्चा केली, त्यानंतर विवाहिता व तिचे पती या दोघांनी प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. नवाल यांनी मंगळवारी सकाळी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. या महिलेने एकाचवेळी तीन मुलींना जन्म दिला आहे. यात एक मुलगी ही सर्वसामान्यपणे जन्माला आली आहे. तर इतर दोघी एकमेकांना जुळलेल्या असून जुळ्या जन्माला आल्या आहेत. नवजात जुळ्या लेकींचा मानेवरचा भाग स्वतंत्र आहे. मात्र शरीर, हात आणि पाय एकत्र जुळलेले आहेत, दोघींना एकत्रच दोन हात आणि दोन पाय आहेत. तर दोघांना हृदय सुध्दा एकच असल्याने एकाच हृदयावर दोघांचाही श्वास आणि जीवन आयुष्यभरासाठी अवलंबून असणार आहे.

या एकमेकांना शरीराने जुळलेल्या दोन्ही मुलींचे वजन सव्वा दोन किलो आहे. दोघींना एकच हृदय, दोन हात आणि दोन पाय आहेत, शरीर एकच असल्याने दोघा जुळलेल्या मुलींना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या दोन्ही जुळलेल्या मुलींवर शस्त्रक्रिया करणे सुध्दा अवघड असल्याचं मत बालरोग तज्ञांनी व्यक्त केंल आहे.