म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून नाराज नेत्यांनी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी केली. कर्नाटकमधील पक्षाच्या विजयानंतर विश्वास उंचावलेल्या श्रेष्ठींनी आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले.

काँग्रेसच्या आदिवासी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे आणि माजी मंत्री सुनील केदार व विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय स्थिती व संघटनात्मक कार्यपद्धतीची माहिती दिल्याचे समजते. महाराष्ट्रावर आता लक्ष न दिल्यास दोन प्रादेशिक पक्षांमुळे पक्षाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा धोका या नेत्यांनी व्यक्त केला. राज्यात पक्षाची व्होट बँक हळूहळू संपुष्टात येत आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे संघटनात्मकदृष्टीने आताच ठोस पावले उचलण्यात यावी, अशी भूमिकाही शिष्टमंडळाने मांडली.

काँग्रेस कार्यसमितीची येत्या ८-१० दिवसांत रचना करण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन’ करण्याचे संकेत दिल्लीतील बड्या नेत्यांनी दिल्याचे कळते. माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट झाली नसल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासारखे बरेच नेते अलिप्त असल्यासारखे आहेत. या नेत्यांनाही सक्रिय केल्यास पक्षाला त्याचा लाभ होईल, असाही असंतुष्टांचा प्रयत्न आहे.

Congress News : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप? पटोलेंच्या गच्छंतीसाठी बड्या नेत्याने शिष्टमंडळासह दिल्लीत तळ ठोकला!

गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत वाद सुरू आहे. वज्रमूठ सभेची जबाबदारी सुनील केदार यांच्याकडे आल्यानंतर बऱ्याच नेत्यांनी यापासून अंग चोरले. अखेरच्या दोन दिवसांत काही नेते सक्रिय झाले. प्रदेशाध्यक्षांविरुद्ध यापूर्वीही अल्पसंख्याक समुदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आदिवासी समाजही नाराज असल्याचे बोलले जाते. पक्षातून बडतर्फ केलेले डॉ. आशिष देशमुख यांनी जाहीरपणे ओबीसींच्या मुद्यावरून प्रदेशाध्यक्षांना घरचा आहेर दिला होता.

Sameer Wankhede: मोहन भागवतांच्या भेटीनंतर समीर वानखेडेंची चौकशी सुरु झाली, काहीतरी काळबेरं आहे: नाना पटोले

चंद्रपूरच्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपसोबत युती केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश देवतळे यांना चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षपदावरून पायउतार केले. देवतळे हे वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. यानंतर वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील असंतुष्टांची बैठक झाली. या बैठकीस सुनील केदार उपस्थित होते. या मुद्यावरून वडेट्टीवार व पटोले यांच्यात वाक्‌युद्ध रंगले होते. आता थेट दिल्ली दरबारात प्रदेशाध्यक्षांविरुद्ध फिल्डिंग लागल्याने येत्या काही फेरबदल होतात का, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू झाली.

२० वर्ष मंत्री राहिलेल्या चुलत्याला हरवून आमदार, पण आता स्वतःचीच पक्षातून हकालपट्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here