कोल्हापूर: अनेक वेळा हुशार मुली लग्न झालं की संसाराच्या गाडीत बसतात आणि आपलं अस्तित्व आणि स्वप्न विसरून जातात. मात्र, संसार सांभाळत सातत्य कष्ट आणि माहेरच्या बरोबरच सासरचा पाठिंबा मिळाला तर मुलगी काय करू शकते हे करवीर तालुक्यातील हळदी गावातील ऐश्वर्या नाईक डुबल यांनी दाखवून दिले आहे. कालच दि. २५ रोजी जाहीर झालेल्या २०२१ च्या राज्य सेवा परीक्षा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निकालात ऐश्वर्या जयसिंग नाईक-डुबल रा. हळदी, ता. करवीर, सध्या रा. कराड हिची नगरपालिका मुख्याधिकारीपदी निवड झाली आहे.

ऐश्वर्या नाईक डुबल या करवीर तालुक्यातील हळदी गावातील मात्र सध्या नोकरी निमित्त सांगली येथे वास्तव्यास आहे.ऐश्वर्याचे वडील क्रीडा संचालक आहेत तर आई गृहिणी आहे. यामुळे लहानपणापासूनच तिच्या घरात खेळाचे वातावरण असल्याने ती एक राष्ट्रीय पातळीवर खेळणारी उत्कृष्ट अ‍ॅथलेटिक्स व स्विमिंगमधील खेळाडू आहे.ऐश्वर्याने आपले प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत पुर्ण केल आणि पुढे कोल्हापूरातील पद्माराजे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन न्यू कॉलेजमधून पदवी मिळविली. लहानपणापासूनच शालेय जीवनात ती हुशार होती शिवाय उत्कृष्ट खेळाडू देखील होती.

शुभमन गिल आणि साराने इंस्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो, नेमकं झालं तरी काय?

पदवी घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी:

ऐश्वर्याच्या वडिलांची आपली मुलगी सेट परीक्षा द्यावी अशी इच्छा होती मात्र ऐश्वर्याने आपल्याला प्रशासकीय सेवेमध्ये जायचे आहे हे निश्चित केलं होत यामुळे पदवी घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरू केली होती. मात्र कोरोना काळात परिक्षांना विलंब झाला यामुळे मधल्या काळात तिने अर्थशास्त्र विषयातून सेट परिक्षा देत पास झाली. तर MPSC परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात ऐश्वर्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकपदी निवड झाली तर दुसऱ्या प्रयत्नात उप-अधिक्षक भूमिअभिलेख अधिकारीपदी निवड झाली. त्या सध्या सांगली येथे कार्यरत आहेत.

नगरपालिका मुख्याधिकारी पदी पोहोचण्यासाठी मी केलेले कष्ट आणि घरच्यांचा मिळालेला पाठिंबा यामुळे मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले याचा मला आनंद आहे या पदाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची मला संधी मिळेल. मला डीवायएसपी व्हायची इच्छा होती मात्र एवढ्या जागा उपलब्ध नसल्याने मी या पदाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन.

ऐश्वर्या नाईक-डुबल

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या हालचाली, एकनाथ शिंदेंकडून इतक्या जागांची मागणी

सासर आणि माहेरच्या लोकांचाही पाठिंबा:

ऐश्वर्याचे लग्न झाल्याने काम आणि संसार सांभाळत तिने आपला अभ्यास सुरूच ठेवला होता. सातत्य आणि कष्ट याला माहेर आणि सासरच्या लोकांची तिला जोड मिळाली. नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या अंतिम निकालात तिला यश मिळालं आहे. नगरपालिका मुख्याधिकारी पदी तिची निवड झाली. ऐश्वर्याच्या माहेरचे जितके शिक्षित आहेत तितकेच सासरचे देखील आहेत. ऐश्वर्याचे पती संग्राम डुबल हे स्वतः मंत्रालय कक्ष अधिकारी आहेत. तर, सासरे उदयराव डुबल हे डीवायएसपी आहेत यामुळे घरातील सुशिक्षित वातावरण असल्याने तिला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. घरच्यांसोबतच त्यांना अनेक जणांचे मार्गदर्शन लाभले आणि आज त्यांनी तिसऱ्यांदा स्पर्धा परीक्षेत यश मिळवत नगरपालिका मुख्याधिकारी पदी पोहोचल्या आहेत.

नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी दिल्लीत फिल्डिंग, हायकमांड लवकरच महाराष्ट्रात भाकरी फिरवणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here