जळगाव: चारचाकीवरुन चालकाचे नियंत्रण सुटून गाडी झाडावर धडकल्याने चारचाकीतील एकाचा मृत्यू तर चालक गंभीर जखमी झाला आहे. जामनेर वाकडी रस्त्यावर शहापूरजवळ मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. आनंदा भीमराव जगताप (रा. भारुडखेडा ता. जामनेर) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, गुरुवारी आनंदा जगताप यांच्या मुलाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात मुलगा हा शाळेतून पहिला आला. मात्र हा निकाल तसेच पोराचं यश पाहण्यापूर्वीच मध्यरात्री काळाने झडप घातली व आनंदा जगताप यांचा मृत्यू झाला.जामनेर तालुक्यातील भारुडखेडा येथे आनंदा जगताप हे कुटुंबासह वास्तव्यास होते. बुधवारी आनंदा जगताप हे त्यांचे मित्र दिपक शेळके यांच्यासोबत मॅजिक या चारचाकीने कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. काम आटोपून घराकडे परतत असतांना रात्री अडीच वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील जामनेर वाकडी रस्त्यावर चारचाकीवरुन नियंत्रण सुटल्याने चारचाकी ही रस्त्यालगत झाडावर आदळली. झडक एवढी जोरदार होती की, या अपघातात आनंद जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक दीपक शेळके हे गंभीर जखमी झाली.

लग्नाला ५ दिवस असताना बेपत्ता झाली, मग पाण्याच्या पाइपमध्ये अर्धवट मृतदेह; पोलिसांसमोर विचित्र ‘Death Mystery’
जखमी दिपक शेळके यांच्या माध्यमातून माहिती नातेवाईकांना कळल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. जगताप तसेच जखमी शेळके यांना जळगाव येथे रुग्णालयात हलिवले. याठिकाणी आनंदा जगताप यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शेळके यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताबाबत जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामदास कुंभार हे करीत आहेत.

बस अर्ध्यापर्यंत कापली गेली, बुलढाणा अपघातात ६ जणांनी गमावले प्राण

एकीकडे बारावीत पहिला आल्याचा मुलाचा आनंद तर दुसरीकडे वडिलांच्या मृत्यूचे मोठे दु:ख

आनंदा पाटील यांचा मुलगा गणेश जगताप हा बारावीला होता. भारुखेडा येथील राणिदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. ज्या रात्री अपघात झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी बारावीचा निकाल हा जाहीर झाला. यात गणेश जगताप याला ८३.५० टक्के एवढे गुण मिळाले. व तो शाळेतून तसेच तालुक्यातून कला विभागातून पहिल्या तीन मध्ये उत्तीर्ण झाला. मुलगा गणेश याचे यश बघण्याआधीच अपघातात वडीलांचा दुर्देवी मृत्यू झाला. वडीलांच्या मृत्यूने शाळेत पहिल्या आल्याच्या मुलाच्या आनंदावर विरजण पडले असून त्याच्यावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. दरम्यान गणेश याच्या शाळेतील प्राचार्य तसेच शिक्षकांनी गणेशच्या घरी भेट त्यांचे सात्वंन केले. मुलगा शाळेतून पहिल्या आल्याचा आनंद आणि त्याच दिवशी त्याच्या वडीलांच्या निघालेल्या अंत्ययात्रेने संपूर्ण गाव सुन्न झाले असून या घटनेने सर्वत्र हळहळ वक्त केली जात आहे.

3 COMMENTS

  1. Здравствуйте! Я хочу купить новый телевизор. Мне нужен надежный и качественный аппарат, который будет работать долго и без сбоев.
    Я просмотрел множество моделей в интернете и магазинах, но все они кажутся мне одинаковыми. Я не знаю, какой выбрать.
    Кто-нибудь может посоветовать мне что-то конкретное? Я был бы очень благодарен за помощь.
    Кстати, если у вас есть проблемы с уже имеющимся телевизором, я могу порекомендовать вам отличную компанию, делают хороший [url=https://by.gojo.su/remont-televizorov/mogilev]ремонт телевизоров в Могилеве[/url] любых марок и моделей. Они быстро и качественно выполняют свою работу, так что вы можете быть уверены в результате.
    Но вернемся к покупке нового телевизора. Я хочу, чтобы он имел большой экран, высокое разрешение и хорошую цветопередачу. Также я хотел бы, чтобы у него были все необходимые порты для подключения других устройств, например, игровых приставок или компьютеров.
    Если у вас есть какие-то рекомендации, пожалуйста, поделитесь ими со мной. Я готов потратить немного больше денег, чтобы получить качественный продукт, который прослужит мне долго.

  2. [url=https://kraken.krakn.cc/]рабочее зеркало кракен[/url] – кракен онион, кракен onion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here