​शिर्डी ते भरवीरपर्यंत ८० किमीचं अंतर​

​शिर्डी ते भरवीरपर्यंत ८० किमीचं अंतर​

शिर्डीपासून भरवीरपर्यंतचं जवळपास ८० किमीचं अंतर यामुळे फक्त ४० ते ४५ मिनिटांत पार करता येईल, याशिवाय जर तुम्ही नागूपरहून निघाला असाल तर नाशिकलाही फक्त पाच ते सहा तासात पोहोचता येईल. मुंबई आणि नागपूर यांच्यातलं अंतर १८ तासांवरुन फक्त ८ तासांवर आणणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या समृद्धीलाही हातभार लागणार आहे.

​१४ जिल्ह्यांना होणार फायदा

​१४ जिल्ह्यांना होणार फायदा

नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांतून समृद्धी महामार्ग जातो. याशिवाय चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या १४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या महामार्गाशी महाराष्ट्रातील एकूण २४ जिल्हे जोडले जातील. या मार्गामुळे मुंबई – नागपूर प्रवासातील अंतर कमी होईल शिवाय मराठवाडा-विदर्भच्या विकासालाही चालना मिळणार आहे. रोजगार, वाहतूक, व्यापार, उद्योगाच्याही संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.

​सर्वात महत्त्वाचा टप्पा भरवीर ते ठाणे बाकी

​सर्वात महत्त्वाचा टप्पा भरवीर ते ठाणे बाकी

शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्यात ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, छोट्या आणि मोठ्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज अशा सुविधांचा समावेश आहे. ३२०० कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या या दुसऱ्या टप्प्यामुळे समृद्धी महामार्ग एकूण ६०० किमी लांबीचा झाला आहे. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा भरवीर ते ठाणे बाकी आहे.

मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग कधीपर्यंत?

मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग कधीपर्यंत?

शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा या टप्प्यात १२ बोगदे आणि १६ छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल, अशी माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल. सध्या शिर्डीपर्यंत जुन्या महामार्गाने जावं लागतं, ज्यासाठी तीन ते चार तास लागतात.

आता १०२ किमी महामार्गाचं काम पूर्ण होण्याची प्रतिक्षा​

आता १०२ किमी महामार्गाचं काम पूर्ण होण्याची प्रतिक्षा​

दुसऱ्या टप्यात सिन्नरच्या गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे या भागात जाण्यासाठी महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेजपासून घोटी १७ किमी अंतरावर आहे. त्यामुळे या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवासही जलद होईल. आता फक्त पुढच्या १०२ किमी महामार्गाचं काम पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here