नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने २००० रूपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. १९ मे रोजी आरबीआयने २००० रूपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केली. यानंतर लोकांनी नोटा बदलून घेण्यासाठी किंवा त्या बँकेत जमा करण्यासाठी २० सप्टेंबर २०२३ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. पण आरबीआयच्या या घोषणेनंतर बँकेत नोटा जमा करण्याऐवजी लोकांनी असा इंडियन जुगाड लावला की वाचून तुम्ही थक्क व्हाल.आयकर विभागापासून वाचण्यासाठी लोक बँकेत जाण्याचं टाळत आहेत. यामुळे नोटा बदलण्यासाठी अशा युक्त्या वापरल्या जात आहेत, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सध्या मार्केटमध्ये फक्त २००० च्या नोटांचाच ओघ पाहायला मिळत आहे. दोन हजाराच्या नोटा अचानक गायब झाल्याने दुकानदार हैराण झाले असले तरी या संधीचा फायदा घेण्यात मात्र ते हुशार निघाले.
२००० रुपयांची नोट खर्च करण्यासाठी जुगाड….
२००० नोटा बदलण्यासाठी काय आहे इंडियन जुगाड….
२००० रुपयांची नोट खर्च करण्यासाठी जुगाड….
काही जणांनी, २००० रूपयांच्या नोटा खर्चण्यासाठी महिन्याभराची दारू खरेदी करून ठेवली आहे. काही जणांना या नोटांचा वापर करून गोव्याला हनिमूनचा प्लॅनिंग केला आहे. तर काहींनी लगेच गाडी बुक केली. २००० नोट बँकेत जाऊन बदलण्यापेक्षा लोक गाड्यांमध्ये इंधनाच्या टाक्या फुल्ल करत आहेत. काहींनी या पैशांचं सोनं खरेदी केलं तर काहींनी हा पैसा मंदिरात देवाच्या कामासाठी वापरला.
२००० नोटा बदलण्यासाठी काय आहे इंडियन जुगाड….
– लोकांनी खरेदी केलं महागडं सोनं…
– एक महिन्याचा दारूसाठी खरेदी करून घेतला
– या गुलाबी नोटा खर्च करण्यासाठी थे हनिमून प्लान
– लोकांनी २००० नोटांमध्ये खरेदी केली नवीन कार
– कॅश ऑन डिलिव्हरी वेपन
– देवाच्या कामासाठी पैशांचा वापर…
– दुकानदार लालच घेऊन काम करत आहेत…
– २००० च्या नोटांमुळे आंब्याची विक्री वाढली