म. टा. प्रतिनिधी, पुणेः घरात पाय घसरून पडल्याने ३९ वर्षीय महिला ब्रेनडेड झाली. अखेर त्यांच्या पतीने अवयवदानाची परवानगी दिल्याने परराज्यात चेन्नई आणि हैदराबाद येथील गरजू रुग्णांना अवयव मिळू शकले. पुणेकर महिलेच्या अवयवदानामुळे या दोन राज्यांशी नाते जुळल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्याशिवाय पुण्यातील अन्य रुग्णांना अवयव मिळाल्याने सात जणांना जीवदान मिळाले.

‘करोनाच्या सद्यस्थितीत पुण्यात या वर्षातील मे महिन्यापासून आतापर्यंत नववे अवयवदान यशस्वी झाले. ३९ वर्षाची महिलेच्या मेंदूला दुखापत झाल्याने तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला ब्रेनडेड जाहीर केल्यानंतर पतीने अवयवदानाची संमती दिली. त्यानंतर त्या महिलेचे हृदय चेन्नईला आणि फुफ्पुस हे हैदराबाद येथील रुग्णांना देण्यात आले. तसेच यकृत मंगेशकर रुग्णालय आणि दोन्ही मूत्रपिंड हे बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आल्या. तसेच डोळ्यातील नेत्रपटल आणि यकृत हे मंगेशकर रुग्णालयातील नेत्रपेढीला दिले. या महिलेमुळे सात जणांना जीवदान मिळाले’, अशी माहिती प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here