मुंबई- अभिनेता एजाज खानला २०२१ मध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. आता दोन वर्षांनी त्याची मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. एजाज म्हणाला की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आज आपल्या कृत्याची शिक्षा भोगत आहेत. समीर यांच्याच पथकाने एजाजला अटक केली होती. २०२१ मध्ये समीर वानखेडे यांनी ड्रग्ज घेणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी एनसीबीच्या रडारवर अनेक सेलिब्रिटी होते.दिग्दर्शकासोबत नाना पाटेकरांचं भांडण अन् मुलगा हिरो झालाच नाही, सध्या काय करतो मल्हार?
समीर यांना त्यांच्या कर्माची फळं मिळत आहेत- एजाज खान

एजाज खान १९ मे रोजी तुरुंगातून बाहेर आला. जवळपास २६ महिने तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर येताच त्याने समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना तो म्हणाला की, ‘समीर वानखेडेंला आज त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागत आहे. त्यांनी जे दु:ख इतरांना दिले, तेच आज त्यांना परत मिळत आहे.’


एजाज म्हणाला- मी दयेची याचना केली होती, पण त्यांनी दया दाखवली नाही

तुरुंगात राहिल्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला, एक वेब सीरिज हातून गेली. २६ महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला, असा प्रश्न एजाजला विचारण्यात आला. याला उत्तर देताना एजाज म्हणाला, ‘तुरुंगात गेल्यानंतर आता मी कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो. मी एसीशिवाय राहू शकतो. तथापि, व्यावसायिकदृष्ट्या मला या वर्षांत खूप त्रास सहन करावा लागला. वेब सीरिज माझ्या हातातून गेली.

‘मी तुरुंगात होतो आणि माझा ९ वर्षांचा मुलगा मनोचिकित्सकाकडे थेरपीसाठी जात होता.. तुरुंगात गेल्यानंतर सहा महिने मी त्याला भेटू शकलो नाही. ईद किंवा बायको-मुलांच्या वाढदिवसाला मला खूप एकटं वाटायचं. तुरुंगात गेल्यानंतर मी भावनिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडलो होतो.

Vicky Kaushal Video: जसं दिसतं तसं असतंच असं नाही.. सलमानच्या व्हिडिओवर अखेर बोलला विकी कौशल
तुरुंगात चांगले जेवण मिळत नव्हते, झोपायला जागा नव्हती

एजाज खानला त्याच आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते जिथे संजय दत्तने शिक्षा भोगली होती. कारागृहाच्या दुरवस्थेबाबत बोलताना तो म्हणाला की, ‘आपण कैद्यांच्या मानवी हक्कांबद्दल बोलतो, पण तसे काहीच नाहीये. तुरुंगात कैद्यांची संख्या खूप जास्त होती. तिथलं जेवणही चांगलं नव्हतं, झोपायलाही जागा नव्हती. ८०० क्षमतेच्या कारागृहात ३ हजार ५०० कैदी होते.

जोपर्यंत या देशात न्याय मिळत नाही तोपर्यंत जनजीवन विस्कळीतच राहणार

एजाज सध्या जामिनावर बाहेर आहे. आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तो म्हणाला की, ‘या देशात न्याय खूप उशिरा मिळतो. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मला न्याय मिळेल हे मला माहीत आहे. मी काही केले नाही हे माझ्या घरच्यांनाही माहीत आहे.’

स्लिट ड्रेस, डेनिम जॅकेट; परिणितीच्या सौंदर्याने लक्ष वेधलं

45 COMMENTS

  1. Anna Berezina is a famed author and lecturer in the area of psychology. With a training in clinical psychology and extensive study experience, Anna has dedicated her craft to arrangement sensitive behavior and unbalanced health: https://dribbble.com/squashiron28. Including her work, she has made impressive contributions to the field and has fit a respected reflection leader.

    Anna’s judgement spans different areas of psychology, including cognitive disturbed, unmistakable certifiable, and ardent intelligence. Her widespread education in these domains allows her to produce valuable insights and strategies for individuals seeking personal growth and well-being.

    As an initiator, Anna has written distinct instrumental books that drink garnered widespread attention and praise. Her books offer down-to-earth advice and evidence-based approaches to forbear individuals command fulfilling lives and reveal resilient mindsets. Through combining her clinical dexterity with her passion on helping others, Anna’s writings secure resonated with readers for everyone the world.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here