पुणे : आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ती मित्राला व्हॉट्सअपवर पाठवली आणि तरुणाने आयुष्याची अखेर केली. खडकवासला धरणात २१ वर्षीय तरुणाने आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे.खडकवासला धरणात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनिकेत सुनील आल्हाट (वय २१ वर्ष, रा. नऱ्हे,पुणे) या तरुणानेही धरणात उडी घेत आयुष्य संपवले. शुक्रवारी सकाळी अनिकेतचा मृतदेह खडकावसला धरणाच्या पंप हाऊस जवळ सापडला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.

मैत्री ठरली प्रणयसाठी जीवघेणी, पट्टीचा पोहणारा मुलगा बुडाला कसा? कुटुंबाच्या संशयाने गूढ उकललं
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दि. २५ मे रोजी अनिकेत हा कुणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. निघण्या अगोदर अनिकेतने चिठ्ठी लिहून ठेवली होती की, मी आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये.

सात वर्षात दोन राष्ट्रपती पदकं, दोनदा पदोन्नती, तरीही पोलिस निरीक्षकाचे निलंबन, कारण ठरला…
त्यानंतर ही चिठ्ठी त्याने त्याच्या मित्राच्या व्हॉट्सअपवर पाठवली. त्यानंतर त्याच्या मित्राने ही गोष्ट त्याच्या नातेवाइकांना सांगितली. अनिकेतने मोबाईल बंद ठेवला असल्याने त्याच्याशी संपर्क होत नव्हता. नातेवाइकांनी थेट पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

घरमालकासोबत बायकोचे अनैतिक संबंध, भाडेकरूने साथीदारासोबत काढला काटा

मात्र, शुक्रवारी सकाळी पोलिसांना खडकवासला धरणात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी त्याच्या खिशात मोबाईल आढळला. त्यातील सिम दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना फोन केला. त्यानंतर संपूर्ण गोष्टीचा उलगडा झाला.

आई-वडिलांना हरिद्वार यात्रेसाठी रेल्वेत बसवलं, चालत्या ट्रेनमधून उतरताना पडून लेकाचा मृत्यू
या घटनेची पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास हवेली पोलिस करत आहेत. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here