सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. संसदेचे हे अर्थसंकल्पी अधिवेशन दोन सत्रांत बोलावले जाणार आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येतो.
३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत संसदीय अधिवेशनाचे पहिले सत्र पार पडेल आणि २ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा पार पडेल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विविध संसदीय समित्यांना अर्थसंकल्पाचे आकलन करून त्यावर आपल्या सूचना देता याव्यात, यासाठी संसदीय अधिवेशनाच्या दोन सत्रांमध्ये साधारणपणे एका महिन्याचा वेळ मोकळा राखला जातो.
केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसीनंतर संसदीय अधिवेशन सुरू करण्याचे निर्देश देतात. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होते. यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे पहिले बजेट असणार आहे.
दरम्यान, जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीची झळ देशालाही सहन करावी लागत आहे. देशातील मंदीचे ढग गडद होताना दिसत आहे. २०१९-२० मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ५ टक्केच राहण्याचा अंदाज खुद्द सरकारकडून वर्तविला गेला आहे. बाजारपेठेत वस्तू व सेवांची ग्राहकांकडून घसरलेली मागणी अद्यापही रुळावर येण्याची शक्यता नसून खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघही रोडावताच राहण्याचे भाकीत केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तविले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री देशाच्या अर्थसंकल्पात उद्योग क्षेत्र, वाहन क्षेत्र, सामान्य नागरिकांना काय दिलासा देतात, याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times