रुग्णालयांकडून तयारी
डिस्चार्ज रुग्णांमध्ये अशा समस्या समोर आल्यानंतर रुग्णालयाकडून अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. यामध्ये पोस्ट कोविड केअर देणारे ‘डेडिकेटेड क्लिनिक्स’ बनवण्यापासून ते व्हॉटसअप ग्रुप बनवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये डॉक्टर आणि रुग्णांचाही समावेश आहे. यामुळे मॉनिटरिंग आणि फीडबॅक प्रोसेसमध्ये सुधारणा होतेय.
वाचा :
वाचा :
नुकतंच, करोनानंतर डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये ऑक्सिजन प्रमाण खालावल्याचं आणि श्वास घेण्यात अडथळे येत असल्याची माहिती नोएडामध्ये एका रुग्णालयाला माहिती देण्यात आली. रुग्णाची परिस्थिती बिघडण्याच्या आधीच त्याला रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलं. शारदा रुग्णालयाचे प्रवक्ते डॉ. अजीत कुमार यांनी म्हणण्यानुसार, ‘४५ वर्षीय रुग्णाला जुलै महिन्यात डिस्चार्ज दिला गेला होता आणि ऑगस्टच्या सुरुवातीला त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं कारण त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होतं तसंच ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळीही घसरली होती. कोविड १९ चा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांची ही परिस्थिती होती’ .
दिल्लीचे सर गंगाराम रुग्णालयाचे वरिष्ठ चेस्ट फिजिशियन डॉ. अरुप बसु यांच्या म्हणण्यानुसार, कोविड १९ मुळे फुफ्फुसांना नुकसानं होतं. त्यामुळे संक्रमण संपुष्टात आल्यानंतरही त्या नुकसानीचा परिणाम रुग्णाच्या शरीरावर पाहायला मिळतो. जाड डिश्युजवर असलेले निशाण फुफ्फुसांना योग्य पद्धतीनं काम करण्यासाठी रोखतात आणि अतिरिक्त ऑक्सिजनची गरज भासते.
आता, करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं असलं तरी या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे फुफ्फुसं खराब होण्याची चिंता डॉक्टरांना सतावतेय. अशा रुग्णांना ठीक करणं खूपच जिकरीचं असल्यानं त्यांना ही भीती वाटतेय. रुग्णांना अगोदरपासूनच मधुमेहासारखे आजार असतील तर अशा रुग्णांवर उपचार करणं आणखीनच आव्हानात्मक होऊन बसतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I really like and appreciate your blog post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Thank you for publishing this awesome article.