म. टा. प्रतिनिधी,

आमदार यांच्या खासगी गाडीवरील चालक अनिल पवार याला गाडी अडवून भर चौकात जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार येथे वाघवाडी रोडवर घडला. अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, इस्लामपूर येथील गुंड शकील गोलंदाज आणि त्याचा साथीदार सुहेल मुल्ला या दोघांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांचे खासगी वाहन क्र. एम. एच १० डी एल १०१५ या वाहनावर मी चालक आहे . शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास मी व स्वप्नील सूर्यवंशी असे आम्ही दोघे (वाहन क्र. एम. एच १० डी एल १०१५) या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी वाघवाडी रोडला असलेल्या प्रतिक पेट्रोल पंपावर निघालो होतो. वाघवाडी रोडला वळलो असता समोरून एक चार चाकी (वाहन क्र. एम एच ४३ ए ई ०००७) या वाहनावरील चालकाने आडवी गाडी मारून आम्हाला आडवले. या वाहनात येथील गुंड शकील गोलंदाज व त्याच्यासोबत त्याचा साथीदार सुहेल मुल्ला हे होते.‘तू माझ्या गाडीच्या आडवी गाडी मारतोस काय रे, असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. त्यावेळी मी गाडीतून खाली आलो असता, त्यांनी चाकू काढून माझ्या पोटात मारण्याचा प्रयत्न केला. चाकूचा वार चुकवत मी गाडीत बसलो. यानंतर दे दोघेही जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले.

या प्रकरणी पवार याच्या फिर्यादीनुसार, इस्लामपूर पोलिस ठाण्यात कलम ३०७ नुसार गोलंदाज व त्याचा साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. गोलंदाजला पोलिसांनी अटक केली आहे. गोलंदाजला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याचा साथीदार सोहेल मुल्ला हा अजूनही पसार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शकील गोलंदाज हा सराईत गुन्हेगार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here