Ratnagiri Accident : पुण्याहून चिपळूण येथे लग्नासाठी निघालेल्या कार आणि लक्झरी बसचा अपघात झाला. या अपघातात पुण्यातील एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
हायलाइट्स:
- पुण्यातील एकाचा रत्नागिरीत मृत्यू
- कार आणि लक्झरी बसचा अपघात
- अपघातात तिघे जखमी
याबाबत सविस्तर वृत्त असे की पुण्यातील जैन हायस्कूल मधील एका शिक्षकाच्या मुलीचे लग्न कापसाळ येथे होते. त्यासाठी तिचे काही सहकारी पुण्याहून वॅगनआर गाडी क्रमांक एम एच १४..ईवाय ७६६३ घेऊन लग्नाला येत होते. प्रीतम तावरे हा गाडी चालवत होता तर त्याच्या पुढच्या सिटवर राजेंद्र राऊत बसले होते तर मागील सिटवर दादासाहेब अडसुळे,राजेश सोदा हे बसले होते. यावेळी गाडी कुंभार्ली घाट उतरून चिपळूण कडे येत असताना हॉटेल निसर्ग समोर रत्नागिरीहुन पुणे कडे जाणारी श्रेयस लक्झरी बस एमएच ११ एच ४७७६ ही गाडी समोरून आली आणि दोन्ही गाडीची समोरासमोर जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
राजेंद्र राऊत यांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दादासो अडसुले,राजेश सोदा,प्रीतम तावरे जखमी झाले अधिक उपचारासाठी चिपळूण येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, श्रेयस लक्झरीचा बस चालक निकेतन मंचेकर रत्नागिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र राऊत यांच्या मृतदेहाचे शविच्छेदन करून त्यांच्या नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. राजेंद्र राऊत यांचे वय ४५ होते. पुणे येथील जैन हायस्कूल मध्ये शिपाई होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा, भाऊ असा परिवार आहे. या सगळ्या अपघात प्रकरणाची नोंद शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.