म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत राज्यातील सरकारी खात्यांत, विभागांत दीड लाखाहून अधिक नोकरभरती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीत दिली.दिल्लीतील प्रगती मैदान येथे नीती आयोगाची बैठक पार पडली. या परिषदेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आदी उपस्थित होते. येत्या २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांनी परस्पर सहकार्याने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केले. विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र वचनबद्ध आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.

४ दशलक्षाहून अधिक एमएसएमईचा मजबूत आधार असलेले महाराष्ट्र हे भारतातील आघाडीवरील औद्योगिक राज्य असल्याचे सांगत, एमएसएमईसाठी क्लस्टर योजना सुरू केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद असलेल्या सर्व प्रकल्पांना आता युतीच्या सरकारने बळ दिले आहे. त्याचाच भाग म्हणून सरकारने अहमदाबाद-मुंबई दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या मार्गातील सर्व अडचणी दूर केल्या आहेत. तसेच, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकापर्ण गुरूवारी करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील राजकीय भूखंडांना चाप; महापालिका मोकळ्या भूखंडांबाबत नवे धोरण आखण्याच्या तयारीत
वॉटरग्रिडसाठी आर्थिक सहाय्याची मागणी

विदर्भातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी, तसेच मराठवाडा आणि खानदेश या दोन्ही प्रदेशांना लाभ व्हावा यासाठी शासनाकडून नदीजोड प्रकल्प प्रस्तावित आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. मराठवाडा विभागासाठी ‘वॉटरग्रिड’ योजना सुरू झाल्याचे नमूद करीत, यासाठी केंद्रशासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here