मुंबई : जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि करोना संकटावर बड्या अर्थव्यवस्थांचे आर्थिक पॅकेज यामुळे कमॉडिटी बाजार अस्थिर बनला आहे. त्यामुळे सोने आणि चांदीत नफावसुली होताना दिसत आहे. आज सकाळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ३९ रुपयांनी कमी झाला आणि ५२१८८ रुपये झाला. त्याने ५२११३ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. मात्र २७९ रुपयांनी वधारला असून तो एक किलोला ६७४५० रुपये झाला आहे.

रशियाने करोनाप्रतिबंधात्मक लशीचे उत्पादन जोरात सुरु केले आहे. तर इतर देशांचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या निमित्ताने तेजीत आलेले सोने आणि चांदीच्या वाढीला ब्रेक लागला आहे. रशियात करोना लस तयार झाल्याने या महामारीवर नियंत्रण मिळवण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे जागतिक कमॉडिटी बाजारातदेखील सोन्याचा दरात मोठी घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ११६.९६ डॉलरने कमी झाला. जागतिक बाजारात सोने दर प्रती औंस ५.६७ टक्क्यांनी घसरून १९४४.४५ डॉलरवर बंद झाला. तर डिसेंबरचा सोन्याचा भाव ५.६८ टक्क्यांनी घसरून १९५३.७० डॉलर झाला. सध्या सोन्याचा भाव १९४१.५ डॉलर प्रती औंस असून त्यात ०.२ टक्के घसरण झाली आहे.

goodreturs या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५१२४० रुपये आहे. तर २४ कॅरेट भाव ५२२४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटसाठी सोने दर ५११७० रुपये असून २४ कॅरेटसाठी तो ५५११० रुपये आहे. कोलकात्यात सोन्याचा २२ कॅरेट साठी ५१७७० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५४४६० रुपये आहे. चेन्नईमध्ये सोने २२ कॅरेटसाठी ५१०२० रुपये असून २४ कॅरेट ५५६७० रुपये आहे.

वाचा :

आठवडाभरात झाली मोठी उलथापालथ
गेल्या आठवड्यात कमॉडिटी बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान सोने आणि चांदीच्या भाव मोठी उसळी दिसून आली. या काळात सोने २३०२ रुपयांनी महाग झाले होते. तर चांदी तब्बल १०२४३ रुपयांनी वधारले होती. मात्र त्यानंतरच्या सत्रात नफेखोरांनी गुंतवणूक काढून घेतली. यामुळे या मौल्यवान धातूतील तेजीला ब्रेक लागला. १० ते १४ ऑगस्ट दरम्यान सोने २६४१ रुपये तर चांदी ५८४० रुपयांनी स्वस्त झाली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here