म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याची आतल्या गोटातील माहिती आहे’, असे म्हणत, ‘महाविकास आघाडीत ज्या पक्षाची ताकद जास्त त्याला पुण्यातून उमेदवारी मिळावी’, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे.लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होत असल्याने पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. मात्र, ‘ही निवडणूक होण्याची दाट शक्यता असल्याची खात्रीशीर माहिती आपल्याला आहे’, असे अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात नमूद केले. ‘महाविकास आघाडीतील ज्यांची जिथे जास्त ताकद आहे, तिथे त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायला हवे. पुण्यात कुणाची ताकद आहे हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले यावर ठरते. आमची ताकद किती आहे हे माहिती आहेच’, असे सूचक विधान पवार यांनी केले. त्याचसोबत, ‘मित्रपक्षालादेखील यावर बोलण्याचा अधिकार आहे’, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लागणार का? अजित पवारांनी सांगितली आतल्या गोटातील बातमी, म्हणाले…

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना ‘भावी खासदार’ अशा शुभेच्छा देणारे पोस्टर पुण्यातील चौकात झळकले होते. त्यानंतर प्रशांत जगताप यांनीदेखील, ‘संधी दिल्यास ही जागा चांगल्या तयारीने लढवेन’, असे सांगितले होतं. त्यानंतर अजित पवार यांनीही त्यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे शनिवारचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

तोकडे कपडे अन् भारतीय संस्कृती; मंदिरात ड्रेसकोडचा प्रश्न अजित पवारांचं परखड मत

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपविरोधात तब्बल ४० वर्षांनी विजय खेचून आणला होता. त्यात काँग्रेसकडून अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर यांच्या नावांची चर्चा उमेदवारीसाठी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here