पुणे (खेड) : सद्या गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते. त्यातच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला आहे. खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पण बैलगाडा धावत असताना मार्गात आलेल्या एका मुलाला एका घोडीने तुडवले, तर बैलाने त्याच्यावरून उडी मारल्याने तो मुलगा थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक जणांच्या काळजाचा ठोका चुकल्याचं पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतून बैलगाडा शौकीन आले होते. मात्र, बैलगाडा शर्यत सुरू असताना समोरून बैलगाडा येत होता. त्या बैलगाड्यांच्या पुढे एक घोडी देखील होती. त्यात एका घोडीवर एक व्यक्ती देखील बसलेला होता. Narendra Modi : नव्या संसद भवनाचं लोकार्पण, सेंगोलची लोकसभेत स्थापना, नरेंद्र मोदींचा साष्टांग दंडवत आपल्या दिशेने हे घोडे आणि बैलगाडा येताना दिसले तेव्हा सर्वांनी बाजूला पळ काढला. मात्र, एक मुलगा त्या घोडीच्या समोर आल्याने ती घोडी त्या मुलाला धडकली त्यामुळे घोडी आणि घोडीवर बसलेला व्यक्ती आणि तो मुलगा खाली पडला. मात्र, त्या घोडी पाठोपाठ बैलगाडा येत होता. बैलाने त्या मुलाच्या अंगावरून उडी मारून तो पुढे गेला. त्यामुळे त्या मुलाचा जीव थोडक्यात बचावला. या अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.