जळगाव : आजी-आजोबा आणि नातवांमध्ये अनोख नातं असतं. मुलांची लग्न झाले की, आजी-आजोबांना आपल्या नातवाची ओढ असते. मात्र, नातवाची ओढ असलेल्या आजीवर नातवाला पाहण्याआधीच नियतीने डाव साधला आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजता आजीचा अल्पशा आजाराने निधन झाले, तर दुसऱ्या दिवशी शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास नातवाचा जन्म झाला. रावेर तालुक्यातील कळमोदा येथे ही घटना घडली आहे. अनिता शशिकांत जावळे (वय ५१) असं मयत महिलेचं नाव आहे. रावेर तालुक्यातील कळमोदा येथे अनिता शशीकांत जावळे या वास्तव्यास होत्या. त्यांना आशिष आणि रितेश अशी दोन मुले. मात्र, नोकरी निमित्ताने ही दोन्ही मुले गावाकडे न राहता मुंबईत स्थायिक झाले आहेत. अनिता जावळे यांचा मुलगा आशिष याची पत्नी गर्भवती होती. आशिष हा वडील होणार होता, तर अनिता जावळे या आजी बनणार होत्या. याबरोबरच जावळे परिवारात पहिल्यांदाच नवीन सदस्य येणार असल्याने मोठा आनंद अनिता यांच्यासह कुटुंबियांमध्ये होता. गेल्या काही दिवसांपासून जावळे परिवारात आनंदाचे वातावरण होते. नातवाचे गोडवे गाण्याआधीच आजीने घेतला जगाचा निरोपघरात आनंदाचे वातावरण असतांना दुसरीकउे अनिता जावळे यांची प्रकृती ठीक नव्हती. प्रकृती अत्यंत खालावल्याने पुढील उपचारासाठी अनिता जावळे यांना मुंबई येथे हलविण्यात आले होते. उपचाराला अनिता जावळे यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शुक्रवारी रात्री अनिता जावळे यांची प्रकृती जास्तच खालावली. अनिता जावळे यांची सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. रात्री १२ वाजता अनिता जावळे यांचे निधन झाले. अनिता जावळे यांच्या निधनामुळे दुखा:चा डोंगर कोसळला मात्र ज्या घटनेमुळे जावळे यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. तो नवीन सदस्य जन्माला आला. शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास आशिष यांच्या पत्नीची बदलापूर येथे प्रसूती झाली. त्यांनी मुलाला जन्म दिला. एकीकडे आनंद तर दुसरीकडे असा दुर्दैवी आणि वाईट प्रसंग जावळे परिवारावर ओढावला. शनिवारी दुपारी अनिता जावळे यांच्यावर शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. जन्माच्या आधीच आजीच्या मृत्यूने नातू सुध्दा आता आपल्या आजीच्या प्रेमाला पोरका झाला आहे. नातवाला पाहण्याआधीच, नातवाचे गोडवे गाण्याआधीच आजीचा मृत्यू झाल्याच्या या घटनेनं सर्वच सुन्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here