रत्नागिरी : डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी 28 मे रोजी रविवारी निवड समिती समोर वीस उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या वीस जणांमधून पाच जणांची निवड करून निवड समिती या पाच नावांची शिफारस राज्यपाल महोदयांकडे करणार आहे. त्यानंतर या पाच जणांची मुलाखत घेऊन राज्यपाल महोदयांकडून यातील एका व्यक्तीच्या नावावर कुलगुरू पदासाठी अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल.कुलगुरू पदाची निवडीसाठी सध्या कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या सहा जणांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केले आहेत. यामध्ये डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यमान प्रभारी संशोधन संचालक व ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय भावे, विभाग प्रमुख व माजी संशोधन संचालक व उद्यान विद्या महाविद्यालय प्रमुख व सहयोग अधिष्ठाता डॉ.पराग हळदणकर,माजी शिक्षण संचालक विद्यमान वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सतीश नारखेडे, कृषीविद्या विभागप्रमुख डॉ.प्रशांत बोडके, प्रतिनियुक्तीवर असलेले राज्य कृषी परिषदेचे संचालक (शिक्षण) प्रा. डॉ. यू.एस.कदम, अतिरिक्त कार्यभार असलेले कुलसचिव डॉ. बी.आर.साळवी या सहा नावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त राज्यातील अन्य कृषी विद्यापीठातील इच्छुक व कृषी अनुसंधान परिषदेवरील काही इच्छुकानीही या कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज केले आहेत. एकूण 35 ते 40 अर्ज कुलगुरू निवड समितीकडे कुलगुरू पदासाठी आले आहेत.

कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपाल महोदयांकडून नियुक्त करण्यात आलेला शोध समितीच्या अध्यक्षपदी कृषी अनुसंधान परिषदेचे निवृत्त डायरेक्टर जनरल डॉ.एस. अय्यप्पन तर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहसंचालक डॉ.पी एन साहू यांची समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. तसेच अन्य दोन ते तीन कृषी शास्त्रज्ञांचा या समितीमध्ये समावेश आहे.

कुलगुरू पदासाठी इच्छुकांमधून अर्ज केलेल्या एका व्यक्तीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वजन वापरल्याची चर्चा आहे. याच व्यक्तीच्या पीएचडी पदवीच्या ग्राहयतेबाबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी त्री सदस्यीय चौकशी समितीही नेमली होती. या वृत्ताला दुजोरा देत हा चौकशी अहवाल राज्य कृषी परिषदेकडे देण्यात आल्याची माहिती कुलसचिव कार्यालयाकडूनही देण्यात आली आहे. हा चौकशी अहवाल या समितीकडून सकारात्मक देण्याचा प्रयत्न झाला असला तरी या समितीमधील एका कृषी शास्त्रज्ञाने यावर सही केलेली नाही. त्यामुळे कुलगुरू पदासाठी पीएचडी पदवीच्या ग्राह्यतेबाबत कुलगुरू निवड समिती व राज्यपाल महोदयांकडे कोकणातील काहींनी तक्रारीही केल्याची माहिती आहे.
दिल्ली विद्यापीठाचा मोठा निर्णय! राष्ट्रकवी इक्बाल अन् गांधीजीऐवजी आता सावरकरच…
दरम्यान बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरती कोकणातील असलेल्या कृषी शास्त्रज्ञाचीच निवड करण्यात यावी तरच कोकण कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर घसरलेले मानांकन रोखता येईल व पुन्हा एकदा कृषी विद्यापीठाला चांगले दिवस येतील असं डॉ.चंद्रकांत मोकल यांनी म्हटलं आहे. मावळते कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या आजवरच्या कार्यपद्धतीबद्दल माजी आमदार व कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य डॉ. चंद्रकांत मोकल यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here