‘आम्ही हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या हेट स्पीच आणि कंटेन्टला आळा घालतो. कोणत्या पक्षाची काय राजकीय स्थिती आहे किंवा ते कोणत्या पक्षाशी निगडीत आहेत हे न पाहता फेसबुकची नीती जगभरात लागू केली जाते. आम्ही निष्पक्षता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करतोसोबतच आम्ही आपल्या प्रक्रियांचं नियमित रुपात ऑडिटिंगही करत असतो’ असं स्पष्टीकरण फेसबुकच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आलंय.
संबंधित बातम्या :
वाचा :
वाचा :
वाचा :
या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच एआयएमआयएमचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. एका अमेरिकनं वृत्तपत्राच्या बातमीचा हवाला देत या दोन्ही नेत्यांनी फेसुबक आणि व्हॉटसअपचे आण आरएसएसशी लागेबांधे असून याद्वारे ते बनावट बातम्या आणि द्वेष पसरवण्याचं काम करत असल्याचा आरोप केला होता. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आलाय.
या वृत्तपत्रातील बातमीमध्ये केलेल्या उल्लेखानुसार, ‘रोहिंग्या मुस्लिमांना गोळ्या घातल्या पाहिजे’ अशी फेसबुक पोस्ट भाजपचे नेते टी. राजा यांनी केली होती. या पोस्टमधून मुस्लिमांना गद्दार म्हणत मशिदी पाडण्याची धमकी दिली गेली होती. याला फेसबुकच्या कर्मचाऱ्यानं कंपनीच्या नियमांविरुद्ध असल्याचं सांगत विरोध केला होता. परंतु, कंपनीच्या भारतातील वरिष्ठ कर्मचार्यांकडून मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बातमी समोर आल्यानंतर त्यावरून भारतात विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर आणि सोशल मीडियावर ताशेरे ओढण्यात आले.
इतर बातम्या :
वाचा :
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks so much for the blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.