लखनऊ: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये असलेल्या पॅसिफिक मॉलमध्ये असलेल्या स्पा सेंटर्सविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ८ सेंटर्सवर एकाचवेळी छापा टाकल्यानं एकच खळबळ उडाली. जवळपास तीन तास पोलिसांची कारवाई सुरू होती. पोलिसांनी ६१ तरुणी आणि ३९ तरुणांना ताब्यात घेतलं आहे. स्पा सेंटर्समध्ये आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या कारवाईमुळे पोलीस दलातही खळबळ उडाली. डीसीपींनी महाराजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी शिशुपाल सोळंकी यांना निलंबित केलं आहे.महाराजपूरमध्ये असलेल्या पॅसिफिक मॉलमध्ये असलेल्या स्पा सेंटर्सवर ट्रान्स हिंडनचे डीसीपी विवेक चंद आणि साहिबाबादचे एसीपी भास्कर वर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली धाड टाकण्यात आली. संध्याकाळी पाचच्या सुमारास मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एकाच वेळी ९ स्पा सेंटर्सवर छापा टाकला. त्यामुळे मॉलमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी स्पा सेंटर्समधील खोल्यांची झडती घेतली. तिथे अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडल्या.
हॉटेलमध्ये बरीच गडबड सुरुय! टिप मिळताच पोलिसांची धाड; रुम उघडल्या अन् पोरापोरांची लाईन लागली
पोलिसांनी स्पा सेंटर्स सील केले आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींना लिंक रोड पोलीस ठाण्यात नेलं. स्पा सेंटर्सच्या आडून देहविक्रय केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार कारवाईतून उघड झाला. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना याबद्दल अनेकदा माहिती मिळाली होती. काही जणांनी तक्रारीदेखील केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई हाती घेतली.

स्पा सेंटरच्या चालकांसोबतच तिथे काम करणारे कर्मचारी, देह व्यापारासाठी आणण्यात आलेल्या तरुणी आणि ग्राहक म्हणून आलेल्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. तरुणांमधील बहुतांश जण व्यापारी आणि नोकरदार आहेत. काही विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. परदेशी तरुणींकडूनही इथे देहविक्री केली जायची, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सुट्टी असतानाही शाळेत गेली, टेरेसवरुन पडली; मुलीसोबत काय घडलं? कुटुंबाच्या दाव्यानं नवं वळण
पोलिसांनी अचानक मोठा फौजफाटा आणून मॉलमध्ये कारवाई केली. त्यामुळे मॉलमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. मॉलमध्ये असलेल्या अन्य दुकानांमध्ये शॉपिंग करणाऱ्या अनेकांना धक्काच बसला. कारवाई केवळ स्पा सेंटर्सपर्यंतच मर्यादित आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आल्यानंतर परिस्थिती निवळली. पॅसिफिक मॉलच्या चारही बाजूंना उच्चभ्रू वस्ती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here