पवार साहेबांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी काम करणारे दोघे जण व पवार साहेबांचे तीन सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. ‘हे सगळे सुरक्षारक्षक लोकांना पवार साहेबांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यातून ते काही लोकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे. मात्र, पवार साहेबांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांची पूर्ण तपासणी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते सुरक्षित व व्यवस्थित आहेत. त्यांची नीट काळजी घेतली जातेय,’ असं टोपे यांनी सांगितलं.
वाचा:
‘शरद पवार हे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आम्ही त्यांना नेहमीच काळजी घेण्याबद्दल सांगत असतो. पण त्यांचा उत्साह मोठा आहे. लोकांच्या प्रती त्यांची बांधिलकी आहे. त्यातून ते लोकांमध्ये जात असतात. कदाचित फिरण्यातून त्यांना काही संदेश द्यायचे असतात. त्या सर्व अनुभवांतून जाण्याचा ते आवर्जून प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते स्वतःही काळजी घेत असून चिंता करण्याचे कारण नाही,’ असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
वाचा:
पवार साहेबांच्या निवासस्थानातील बाधित कर्मचारी ज्या ठिकाणी राहतात, तेथील चाळीतील रहिवाशांचं अँटिजेन व अन्य तपासण्या करण्यात येत आहेत. त्या कर्मचाऱ्यांची काळजीही नियमानुसार घेतली जात आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thank you ever so for you article post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Thank you for publishing this awesome article.