बारामती : शेती उत्पादनाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रयोग केल्याचे आपण ऐकले आणि पाहिले असतील. शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय हा महत्त्वाचा व्यवसाय म्हणून केला जातो. आता दुधाची उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन प्रयोग केल्याचे समोर आले आहे. गाईंना चक्क ताक पाजून दुधाच्या उत्पादनात वाढ करण्याचा नवा प्रयोग पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भोंडणी गावातील दोन युवा शेतकरी बंधूंनी यशस्वी केला आहे.एमबीए सारखे उच्च शिक्षण घेत विदेशी बँकेतील नोकरी बाजूला सारून सत्यजित हंगे आणि अजिंक्य हंगे या युवा शेतकरी बंधूंनी पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचे ठरवले. सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत आणि औषधे न वापरता सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून या शेतकरी बंधूंनी गो पालन करण्यास सुरुवात केली.

सध्या हंगे यांच्याकडे १०० देशी गिर गाई आहेत. या गाईंपासून हजारो लिटर दूध उत्पादन होते. या गायींच्या दुधापासून तूप बनवलं जाते. तूप बनवत असताना जे ताक येथे तयार होते. ते ताक या गाई आनंदाने पितात. त्यामुळे या गोठ्याच्या मालकाचा एका वेळेचा चाऱ्याचा खर्च वाचला आहे. तसेच गाईंची उत्पादन क्षमताही वाढली आहे. गाईला ताक पाजण्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगाची पाहणी करण्यासाठी अनेक शेतकरी या गोठ्याला आता भेटी देऊ लागले आहेत.

हंगे बंधू हे आपल्या शेकडो गाईंपासून हजारो लिटर निघणाऱ्या दुधाच्या उत्पादनातून तूप बनवतात. हे तूप देशात विकले जाते. एवढेच नव्हे तर ५० हून अधिक देशात या तुपाची निर्यात होते. लिंबाचे कैरीचे लोणचे, गुळ, शेवगा पानांची पावडर, खपली गव्हाचे पीठ, हरभरा डाळ, तूर डाळ, गुळ पावडर, डाळिंब अशी उत्पादने अमोरे अर्थ ब्रँडच्या नावाने वेबसाइटद्वारे विकली जात आहे.

सख्ख्या भावांनी ठरवलं, सगळं कुटुंब शेतात राबलं, अडीच महिन्यात कष्टाचं सोनं, खरबूज शेतीतून लाखोंची कमाई
देश विदेशात त्यांचे असंख्य नियमित ग्राहक आहेत. तसेच भारतातही २४ हजारांहून अधिक नियमित ग्राहक आहेत. या युवा शेतकरी बंधूंनी टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्मस् नावाची वेबसाइट तयार केली. या वेबसाइट द्वारे ते पारंपरिक पद्धतीने बनवलेले उच्च प्रतीचे तूप निर्यात करतात. त्याचबरोबर या देशी गाईंचे दूध घेऊन सकाळी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेस म्हणजे पहाटे चार ते सहाच्या दरम्यान दूध घुसळून त्यातून लोणी काढले जाते. पुढे लोणी वितळून तूप काढले जाते, अशी माहिती सत्यजित हंगे यांनी दिली.
लेकीच्या लग्नात पित्यानं जे केलं त्यानं कौतुकाचा वर्षाव, शेतकऱ्यांशी इमान राखलं,विवाह सोहळ्याची सगळीकडे चर्चा
सध्या प्रक्रिया युक्त उत्पादनाच्या विक्रीतून तीन कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल होते. खर्च वजा जाता प्रति वर्ष वीस ते पंचवीस लाख रुपये निव्वळ नफा या बंधूंना मिळतो. त्यांच्या या उद्योगामुळे शंभरहून अधिक व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here