‘ माझा जवळचा मित्र आहे. मी स्वतः त्यांच्याशी बोलेन. पार्थ अत्यंत समजदार असल्याने त्यांचा कोणताही प्रॉब्लेम राहणार नाही, याचा मला शंभर नाही तर एक हजार टक्के विश्वास आहे,’ असे राज्याचे आरोग्य मंत्री यांनी स्पष्ट केले. ‘छोट्या मोठ्या गोष्टीतून काही घडले तरी त्या तिथल्या तिथे दुरुस्त करण्याची व्यवस्था शरद पवार यांच्या कुटुंबात आहे,’ असेही ते म्हणाले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे शरदचंद्र पवार साहेब आरोग्य मंदिर या कोविड सेंटरचे उदघाटन झाले. हे एक हजार बेडचे कोविड सेंटर आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून साकारले आहे. या कार्यक्रम नंतर टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार निलेश लंके उपस्थित होते.
पार्थ पवार यांच्याबाबत टोपे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘पवार परिवार हा अत्यंत आदर्श परिवार आहे. त्यांच्यापासून महाराष्ट्रातील सर्व परिवार बोध घेतात. हा अत्यंत प्रगती साधलेला परिवार आहे. आपण पाहिले तर पवार परिवारातील सर्वच घरातील लोक हे अत्यंत कर्तृत्ववान आहेत. सर्व जण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत. मग ते पवार साहेबांचे भाऊ असतील, पुतणे असतील, नातू असतील किंवा तिसरी पिढी सुद्धा चांगलं कर्तृत्व दाखवत आहे. सर्वजण एकीने काम करतात. आता छोट्या मोठ्या गोष्टीतून काही घडले, तरी ते तिथल्या तिथे दुरुस्त करण्याची व्यवस्थाही या कुटुंबात आहे. पार्थ पवार हे माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांच्यासोबत बोलणार आहे. ते अत्यंत समजदार असल्याने त्यांचा कोणताही प्रॉब्लेम राहणार नाही. याचा मला शंभर नाही तर एक हजार टक्के विश्वास आहे.’
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks so much for the blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.