भोर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवण्याचे संकेत दिले, तशी इच्छा व्यक्त केली, त्याची सुरुवातही स्वत:पासून केली. पण पवारांच्या राजीनाम्याला पक्षातील नेतेमंडळींचा, कार्यकर्त्यांचा विरोध झाला आणि पवारांनी राजीनामा परत घेतला. विरोधी पक्षनेते अजिदादांनी भाकरी फिरविण्याची जरुरीच आहे, असा निश्चय बोलून दाखवला. बारामती शेजारील असलेल्या दौंड तालुक्याच्या माजी आमदाराला विधानसभेला तिकीट मिळणार नाही, असे अजितदादांनी जाहीरपणे सांगितले. दादांचा सांगण्याचा अंदाज जरी मिश्किल असला पण त्यांच्या बोलण्यातून भविष्याचा वेध दिसून येत होता, अशा चर्चा तालुक्यात रंगल्या आहेत.विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत भोर येथील पुणे बेंगलोर महामार्गावर असणाऱ्या एका पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात माजी आमदार रमेश थोरात यांना विधानसभेला तिकीट मिळणार नसल्याचेच संकेत अजित पवार यांनी दिले. हॉटेलच्या उद्घाटनला गेले, बाथरुमची स्पेस कमी लक्षात आलं, दादांनी मालकाला तिथेच अंघोळ करायला लावली! अजित पवार काय म्हणाले..?
आप्पा राजकारणात काही खरं नाही..आपले यात केस न केस गेले… त्यामुळे मला असं वाटतं की तुमची पुढची उमेदवारी नाकारतो.. म्हणजे तुम्ही तुमच्या पिढी करिता काही तरी करून ठेवाल…. असे अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. दादांच्या बोलण्याचा रोख उपस्थितांच्या लक्षात आला. कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला. पण दादा भविष्याचा वेध घेत असल्याने आप्पांनी उसणं अवसान आणून चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन तुम्ही म्हणता ते बरोबर… असं दाखवण्याचा प्रयत्न केला.
भालचंद्र जगताप यांच्या ईफोटेल या पंचतारांकीत हॉटेलच्या उदघाट्नासाठी अजित पवार गेले
दादांनी वक्तव्य जरी गमती गमतीमध्ये केलेलं असलं तरी यंदा राष्ट्रवादी दौंडमध्ये विधानसभेला वेगळ्या उमेदवाराची चाचपणी करणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे जर आप्पांना तिकीट नाही मग राष्ट्रवादी तिकीट कुणाला देणार? अशा चर्चांना तालुक्यात उधाण आलं आहे. साहजिकच दौंडच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार असल्याची चर्चा तालुक्यामध्ये रंगू लागली आहे.
श्रेष्ठींनी सांगितले म्हणून थांबलो, विखे पाटलांसोबतच्या वादावरून राम शिंदे यांचे सूचक वक्तव्य मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांचा भाजपचे राहुल कुल यांनी पराभव केला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये प्रथमच राष्ट्रवादीला पराभवाचे तोंड पाहावे लागले. तालुक्यातील एकएक संस्था हातातून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे चित्र आहे. अजित पवार यांनी मिश्किल पणे का होईना पण रमेश थोरात यांची उमेदवारी नाकारतो असं म्हटल्याने ‘नाराज गटात’ उत्साह संचारला आहे.