नवी मुंबई : इंडिगो व्यवस्थापनाकडून वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अनेक कामगारांनी वेगवेगळी कारणे सांगून शेवटी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. तर एका कामगाराने स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. ह्या निर्णयाने संपूर्ण कामगारांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.इंडिगो व्यवस्थापनाच्या छळाला कंटाळून विजय वाघचौरे या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विजय यांना नाहक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजय वाघचौरे यांची पत्नी स्मिता वाघचौरे यांनी केली आहे.

गेली ११ वर्षे विजय वाघचौरे हे इंडिगो कंपनीमध्ये ड्रायव्हर या पदावर कार्यरत होते. विजय वाघचौरे यांनी १९ मे रोजी आत्महत्या केली. विजय यांच्या आत्महत्येला व्हीपी शनल डिसोझा, सहाय्यक व्यवस्थापक अंशुल माहोद, एक्झिक्युटीव्ह विल्सन आणि पुश बॅक ऑपरेटर योगेश पुजारी हे जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्मिता वाघचौरे यांनी केली. या प्रकरणी त्यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

विजय यांना जानेवारी २०२३ मध्ये अर्धांगवायूचा झटका आला होता. बरे झाल्यानंतर ते कामावर रुजू झाले. मात्र त्यांची वैद्यकीय स्थिती माहिती असूनही अधिकाऱ्यांनी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. जाणीवपूर्वक त्यांची बदली टी १ येथून टी २ येथे केली. या ठिकाणी कामावर पोहोचणे कठीण होते, ही बाब विजय यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तरीही त्यांची बदली मूळ ठिकाणी केली नाही. या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे स्मिता यांनी नमूद केले.

नवी मुंबईत दगडखाण घोटाळा? राजकीय नेत्यांचा संबंध असल्याचा राष्ट्रवादी पक्षाकडून आरोप
विजय हे घरात एकटेच कमावते होते. त्यांच्या जाण्यामुळे आमच्या कुटुंबाचा आधारवड हरपला आहे. उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्न आमच्यापुढे उपस्थित झाला आहे. इंडिगो कंपनीने माझी आणि माझ्या दीड वर्षांच्या बाळाची जबाबदारी घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी स्मिता यांनी केली.
Navi Mumbai News : एपीएमसीत लागला दोन हजारांच्या नोटांचा ओघ; काय असेल कारण?
कुटुंबाला भरपाई आणि पत्नीला नोकरी देणार

इंडिगो व्यवस्थपानाच्या छळाला कंटाळून विजय वाघचौरे या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय कामगार सेनेने याबाबत व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यामुळे नरमाईची भूमिका घेत वाघचौरे यांच्या कुटुंबाला पूर्ण भरपाई देण्याचे आणि त्यांच्या पत्नीला तिच्या शिक्षणानुसार नोकरी देण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here