नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अमूल लस्सीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करत आहेत. या व्हिडिओमध्ये अमूलच्या लस्सीमध्ये बुरशी असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये अमूल लस्सीचे पॅकेट उघडून दाखवले जात आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अमूल लस्सीचे तीन ते चार पॅक उघडताना दिसत आहे. ही व्यक्ती अमूलची लस्सी दाखवत असून त्यात फंगसचा संसर्ग झाल्याचा दावा करत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अमूल कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमूलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक मोठी पोस्ट टाकून यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘हा व्हिडिओ भ्रम निर्माण करणारा आहे’
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अमूलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावर आता कंपनीने उत्तर दिले आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे अमूलने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनीची सर्व उत्पादने लीक प्रूफ तंत्रज्ञानाने बनवली जात आहेत. त्यामुळे त्यांच्यात बुरशीचा प्रश्नच येत नाही. कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी कंपनीने आपला टोल फ्री क्रमांकही दिला आहे.

व्हिडिओबाबत संभ्रम
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ कुठे आणि कोणी बनवला आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ लोकांना गोंधळात टाकण्यासाठी बनवण्यात आला आहे.
अमूलने लिहिले आहे की अमूल कंपनी त्यांच्या सर्व ग्राहकांना गुणवत्तेची पूर्ण खात्री देते. कंपनीची सर्व उत्पादने पूर्णपणे सुरक्षित आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओच्या निर्मात्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु हा व्हिडिओ कोणी बनवला याबाबत काहीही समजू शकले नाही.