अहमदाबाद: आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन तगड्या संघात लढत होत आहे. गुणतक्त्यात गुजरातने अव्वल तर चेन्नईने दुफायनल मॅच होण्याआधीच ठरला विजेता; एका गोष्टीने समोर आले IPL 2023च्या चॅम्पियन संघाचे नाव सरे स्थान मिळवले होते. आता स्पर्धेतील हे दोन अव्वल संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच ज्या संघात हंगामातील पहिली मॅच झाली होती त्याच दोन संघात फायनल मॅच देखील होत आहे.महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ४ विजेतेपद मिळवली आहेत. तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने गेल्याच वर्षी पदार्पणाच्या हंगामात विजेतेपद मिळवले होते. या हंगामात दोन्ही संघात याआधी दोन लढती झाल्या होत्या. पहिल्या लढतीत गुजरातने ५ विकेटनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या लढतीत क्वॉलिफायर १ मध्ये चेन्नईने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

मुंबई इंडियन्समुळे होत आहे IPLमध्ये ऐतिहासिक फायनल; इतिहासात प्रथमच होत आहे अशी फायनल मॅच
अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजूंची चर्चा होत आहे. अशात आकडेवारीचा देखील विचार होत आहे. अशीच एक आकडेवारी जी हार्दिक पंड्याचे टेन्शन वाढवणारी आहे. ज्यामुळे गुजरातचे सलग दुसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न भंग होऊ शकते.

IPL Final: धोनी फायनलमध्ये काढणार हुकुमाचा एक्का; हार्दिकला कळणार देखील नाही मॅच कधी गमावली
आयपीएलमध्ये २०११ पासून झालेल्या १२ अंतिम फेरी पैकी ९ वेळा अशा संघाने विजय मिळवला आहे ज्याने क्वॉलिफायर १ मध्ये विजय मिळून थेट फायनलमध्ये प्रवेश केला. याचा विचार करता यंदाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्जला मिळण्याची शक्यता आहे. कारण क्वॉलिफायर १ मध्ये चेन्नईने गुजरातवर शानदार विजय मिळवला होता.

धोनीच्या नेतृत्ववाखाली चेन्नईकडे आयपीएलमध्ये सर्वाधिक फायनल मॅच खेळण्याचा अनुभव आहे. चेन्नईने १४ हंगामापैकी ९ हंगामात अंतिम फेरीत धडक मारली आहे. यामुळेच स्पर्धेतील सर्वात सातत्याने कामगिरी करणारा संघ अशी त्यांची ओळख आहे. चेन्नईचा संघ चार वेळा विजेता तर पाच वेळा उपविजेता झाला आहे. स्पर्धेत अशी कामगिरी अन्य कोणत्याही संघाची नाही.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here